Headlines

पुण्यात 6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला 24 तासांत बेड्या:लोणी काळभोर पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल




खाण्याचे आमिष दाखवून एका ६ वर्षीय चिमुकलीशी लैंगिक गैरवर्तन करणाऱ्या नराधमाला लोणी काळभोर पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. विशेष म्हणजे, गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करत एक आदर्श निर्माण केला आहे. श्रीधर लिंबाजी कांबळे (४६, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना थेऊर येथील भीमनगर परिसरात घडली. पीडित ६ वर्षीय मुलगी आपल्या घराच्या परिसरात खेळत असताना, आरोपी श्रीधर कांबळे याने तिला खाण्याचे आमिष दाखवून जवळ बोलावले. त्यानंतर तिच्याशी लैंगिक गैरकृत्य करून तिचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रकाराबाबत पीडित मुलीच्या आईने तत्काळ लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो ) २०१२ च्या कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *