Headlines

पुण्यामध्ये ‘प्रोजेक्ट एक्स’च्या नावाखालीरेव्ह पार्टी:पहाटे 2:30 वाजता पोलिसांचा छापा; 107 तरुण, 49 तरुणी ताब्यात; 85 लाखांचा मुद्देमाल जप्त




आळंदी-मरकळ रोडवरील तुळापूर येथील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या हाय-प्रोफाइल रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे २:३० वाजता धडक छापा टाकला. ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने आयोजित या बेकायदेशीर पार्टीतून पोलिसांनी तब्बल १०७ तरुण आणि ४९ तरुणींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बहुतांश तरुण-तरुणी आयटी (माहिती तंत्रज्ञान) क्षेत्रातील असून, तिघे जण अल्पवयीन असल्याचा संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा, बंदी असलेले हुक्का फ्लेव्हर्स आणि ९ लाख २२ हजार रुपयांच्या मद्यासह एकूण ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात गेल्या काही वर्षांत अशा पार्ट्यांचे पेव मोठ्या प्रमाणात फुटल्याचे दिसून येत आहे. नियमांचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत पार्टी होती सुरू तुळापूर येथील रिसॉर्ट बंगल्यात मद्य वाटपाची परवानगी केवळ रात्री ११:३० वाजेपर्यंतच होती. मात्र, नियमांचे उल्लंघन करून पहाटेपर्यंत ही पार्टी सुरू होती. गुन्हे शाखेचे १५ अधिकारी आणि ६५ पोलिस अंमलदार अशा एकूण ८० जणांच्या ज्युरी पथकाने पहाटे अडीच वाजता बंगल्याला वेढा घातला आणि अचानक आत प्रवेश केला. पोलिसांनी झाडाझडती घेतली असता, तिथे ३ ग्रॅम गांजा, बंदी असलेले हुक्का फ्लेव्हर्स असलेली तीन कप पॉट्स आणि मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्य आढळले. कुठलीही परवानगी घेतली नाही ही हाय-प्रोफाइल पार्टी पूर्णपणे बेकायदेशीर होती, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते आणि सहपोलिस आयुक्त गौहर हसन यांनी दिली. “ब्लेज एंटरटेनमेंट’चा ऐमन शेख आणि “स्टार लाइट एंटरटेनमेंट’चा यश चौधरी यांनी या पार्टीचे आयोजन केले होते. यासाठी स्थानिक प्रशासन किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. तरुणांना आकर्षिकतसाठी गुप्त कोड प्रश्न : ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टी म्हणजे काय? उत्तर: हा तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी वापरला गेलेला एक गुप्त कोड होता. गांजा, हुक्का सेवन सुरू असल्याने पोलिसांनी छापा टाकला. प्रश्न : यात ताब्यात घेतलेले तरुण कोण आहेत? उत्तर : ताब्यात घेण्यात आलेले बहुतांश तरुण हे आयटी क्षेत्रातील उच्चशिक्षित आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *