Headlines

पुरी येथे जि.प. शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात




तालुक्यातील पुरी येथील जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन ‘धर्म अनेक, भावना एक’ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यात शिवराज्याभिषेक, शंभू गाथा यांसह वैविध्यपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. उपसभापती सुमीत मुंदडा होते. प्रमुख पाहुणे म्हणून बळीराम खताळ, लक्ष्मण भाऊ सांगळे, दत्तात्रय दाणेकर उपस्थित होते. यावेळी अजित तांबे केंद्रप्रमुख पदासाठी पात्र झाल्यामुळे त्यांचा संपूर्ण गावकऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार केला. या वेळी शाळेत शिक्षण घेतलेली श्रद्धा पुरी ही मुलगी पोलिस पदासाठी पात्र झाल्यामुळे तिचाही गावकऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. तिचा सत्कार शिक्षक संपत शिंदे, शिवाजी मोरे, प्रकाश पठारे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच वंदनाताई राऊत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ मोरे, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी मोरे, भाऊसाहेब भिसे, चेअरमन सतीश कबाडे, अजित तांबे, मनेश दारकुंडे, अशोक सोनवणे, हर्षा खरात, संगीता इंगळे, सविता म्हस्के, ऐश्वर्या तुपे, दीपक राऊत, शेषराव शिरवत, राजू सोलट, दीपाली पांगरे व प्रियंका भाटिया यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित तांबे यांनी केले. आभार प्रदर्शन मनेश दारकुंडे यांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *