Headlines

पूर्णा नगरात 830 किलो मांस जप्त; ठाणेदार तत्काळ अटॅच:सात जणांवर गुन्हा दाखल, एलसीबीची अमरावतीत कारवाई‎




आसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुर्णानगर येथे अवैध गोवंश कत्तल खुलेआम सुरू होती. या अवैध कत्तलीसंदर्भात एलसीबीने शुक्रवारी (दि. ११) मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सात जणांवर कारवाई करुन एकूण १३ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे पोलिस अधिक्षकांनी तत्काळ आसेगाव पुर्णाचे ठाणेदार सुरज तेलगोटे यांना शुक्रवारी उशिरा रात्रीच नियंत्रण कक्षात अटॅच केले आहे. पोलिसांनी मोहम्मद जावेद अ. प्यारे (२३), मोहम्मद एजाज शेख ईसा (४०), अब्दुल मोबीन अब्दुल करीम (४५), अब्दुल कदीर शेख युसुफ (४८), अन्सार अब्दुल लतीफ (५०), मकसूद अहमद बशीर अहमद (५०) आणि अब्दुल कलाम अब्दुल जब्बार (५२, सर्व रा. कसाबपुरा, पूर्णा नगर, ता. भातकुली) यांच्यावर कारवाई केली. ही कारवाई एलसीबीचे पीआय अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पीएसआय सतिश झाल्टे, पीएसआय सागर हटवार, शिवाजी घुगे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, हर्षल काळे तसेच आकाश आमटे आणि ठवरे यांनी केली आहे. साडेचार महिन्यातील एसपींची पहिली कारवाई पोलिस अधिक्षक निकेतन कदम यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी पदभार स्विकारला. त्यावेळीपासून मागील साडेचार महिन्यात जिल्ह्यात पहिल्यांदाच एखाद्या ठाणेदाराला तडकाफडकी नियंत्रण कक्षात अटॅच करण्याची ही पहिली कारवाई ठरली आहे. आसेगावला ठाणेदार असलेले सुरज तेलगोटे यांना अटॅच केले असून या प्रकरणाची एसपींनी चौकशीसुध्दा सुरू केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *