![]()
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात राजकीय वातावरण तापले असताना टेंभी नाका येथे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) वतीने शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जमण्यास सुरुवात केली असून, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी आणि खासदार नरेश म्हस्के यांच्यासह पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित आहेत. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे ठाण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेल्या शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त समोर आले आहे. आरोपांची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर राहण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, पूर्णेकर कुटुंबीयांच्या भेटीसाठी ठाकरे गटाचे नेते ठाण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर टेंभी नाका येथे शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली असून, या शक्तिप्रदर्शनाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा…. आरोपांची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत पदावर राहणार नाही:पूर्णेकर हत्याकांडाच्या वाढत्या दबावानंतर मिनाक्षी शिंदेंचा ठाणे जिल्हा महिला प्रमुखपदाचा राजीनामा ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, या प्रकरणात अत्यंत मोठी आणि नाट्यमय राजकीय घडामोड समोर आली आहे. पूर्णेकर यांच्या हत्येचा कट रचल्याचा थेट आरोप असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) मातब्बर नेत्या आणि माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी अखेर आपल्या ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुखपदाचा (महिला जिल्हा संघटक) राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला असून, “माझ्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी पूर्ण होईपर्यंत मी पदापासून दूर राहीन,” अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे समजते. सविस्तर वाचा…..
Source link
पूर्णेकर हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर टेंभी नाक्यावर शिंदेसेनेचे शक्तिप्रदर्शन:भाऊसाहेब चौधरी, नरेश म्हस्के उपस्थित