Headlines

पैशामुळे माणसातला माणुसकीपणाच हरवत चालला:निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे मत, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळामध्ये कार्यक्रम‎




कर्माला माफी नाही, या कलियुगात माणूस संताशिवाय सुखी होणार नाही, या जगाला सुखी व्हायचं असेलतर, हरी नामा शिवाय पर्याय नाही, मी पणा व अहंकार अंगिकारल्यामुळे माणसाच्या जीवनाचा अंत होतो. या पासून माणूस लांब राहिल्यास आनंद व समाधान मिळते, आई, वडील, संत हेच खरे आपल्या जीवनातील उत्तम मार्गदर्शक असून, या युगात माणसाला किंमत नसून पैशाला किंमत असल्याने माणसातला माणुसकीपणा हरवत चालला आहे. असे परखड मत राष्ट्रीय कीर्तनकार व धर्म प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांनी व्यक्त केले. आषाढी एकादशीच्या पूर्व संध्येला अन्नछत्र मंडळातील कीर्तनास हाऊसफुल्ल गर्दी झालेली होती. श्रोतेगण कीर्तन व प्रबोधनाने मंत्रमुग्ध झाले. ते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ३९ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा महोत्सवनिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून, राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर (संगमनेर, अकोलेकर) यांच्या किर्तन कार्यक्रमाने ६ वे पुष्प संपन्न झाले. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन राष्ट्रीय किर्तनकार व धर्म प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर व न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान श्रींची प्रतिमा, नटराज, व स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निवृत्ती महाराजांचे स्वीय सहायक रामायणाचार्य राजन महाराज काशीद वैराग, रामेश्वर जाधव, भैरवनाथ महाराज जाधव, पंढरपूर, नामदेव घावटे (मृदुंगाचार्य), गणेश पवार, पंढरपूर, मंगेश उपासे, मध्वाचार्य महाराज वैष्णव मठ, सोलापूर हे उपस्थित होते. दरम्यान किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख, इंदोरीकर यांचा सत्कार न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा कृपावस्त्र देऊन करण्यात आला. ^गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा आणि ज्ञान, संस्कार तसेच मूल्याधिष्ठित जीवनाची प्रेरणा देणारा पवित्र उत्सव आहे. समाजात अध्यात्म, सेवा आणि मानवतेची भावना दृढ करण्यासाठी अशा उत्सवांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ वर्धापन दिनानिमित्त धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमास माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. या पावन सोहळ्याच्या निमित्ताने समाजात बंधुभाव, सद्भावना आणि सेवाभाव अधिक दृढ व्हावा तसेच प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि समाधान नांदो, ही सदिच्छा व्यक्त करतो. जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा गौरव



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *