Headlines

प्रणिती शिंदेंच्या विचारांचा ऱ्हास झालाय:खरात प्रकरणी त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, हिशोब पूर्ण होणारच, मंत्री गोरेंचे प्रत्युत्तर




काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अशोक खरात यांचे एन्काउंटर होऊ शकते असे म्हटले आहे. यावर बोलताना जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे की, मला अलिकडच्या काळात प्रणिती शिंदे यांचे वक्तव्याचे कौतुक वाटते आहे, त्या असे का वागत आहेत? का असे बोलत आहे? काँग्रेसच्या विचारांचा जो ऱ्हास झाला आहे तसाच खासदार प्रणिती शिंदे यांच्या विचाराचा ऱ्हास झाला आहे, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे. जयकुमार गोरे म्हणाले की, अशोक खरात प्रकरण हे सरकार आणि पोलिसांनी समोर आणले आहे. ते काही काँग्रेसच्या नेत्यांनी काढलेले प्रकरण नाही. खरातसारख्या प्रवृत्तीला ठेचण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. जो पर्यंत त्यांचा पापाचा हिशोब घेतला जाणार नाही तो पर्यंत काहीही घडणार नाही. प्रणिती शिंदेंनी चिंता करण्याची काही गरज नाही. जो जो या पापात सहभागी आहे, ज्यांनी ज्यांनी त्याला मदत केली आहे, त्यांना सुद्धा शिक्षा होईल. शेतकऱ्यांना सोबत घेत महामार्ग पूर्ण करणार जयकुमार गोरे म्हणाले की, शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा आणि भक्तीचा मार्ग आहे. अनेक शक्तीस्थाने जोडण्यासह विकास या मार्गाने होणार आहे. या मार्गासाठी जमीन अधिग्रहण करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी त्यामध्ये जात असल्याने त्या बांधवांनावेदना होतात. त्यांना योग्य नुकसान भरपाई देत पुनर्स्थापित कसे करता येईल् याचा विचार सुद्धा सरकारकडून केला जात आहे. समृद्धी महामार्ग असो की पालखी महामार्ग त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांच्या या भावना होत्या. परंतू शेतकऱ्यांचे समाधान झाल्याशिवाय हा महामार्ग पुढे जाणार नाही. कारण हा भक्तीचा मार्ग आहे, सर्वांना सोबत घेऊन हा महामार्गाचे काम पूर्ण केले जाईल. भोंदू बाबा खरातचा ‘एन्काउंटर’ होऊ शकतो- खासदार शिंदें सोलापूरमधील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी राज्य सरकारवर गंभीर निशाणा साधला असून, खरातचे धागेदोरे थेट सत्तेत बसलेल्या बड्या नेत्यांपर्यंत पोहोचले असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, या नेत्यांची नावे बाहेर येऊ नयेत म्हणून खरातचा ‘एन्काउंटर’ केला जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *