![]()
छप्परबंद शाह फकीर समाजबांधवांच्या शैक्षणिक, सामाजिक व प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी एकजूट दाखवून संघटितपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार चांदवड येथे झालेल्या जिल्हास्तरीय मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. छप्परबंद मुस्लिम शाह फकीर समाज सुधारक मंडळ व चांदवड तालुका शाह समाज यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रहेमत लॉन्स येथे हा मेळावा पार पडला. समाजबांधवांचे विविध दाखले प्रशासकीय पातळीवर प्रलंबित असून, त्यांच्या हक्काच्या मागण्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अजमल शाह होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे उपस्थित होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष शफीक शाह, कार्याध्यक्ष युनुस शाह, कामिल शाह (जळगाव), अफजल शाह (विंचूर), इब्राहिम शाह (मालेगाव), जाकीर गफ्फार शाह, नगरसेवक राजू बागवान, मुसर्रफ शाह (येवला) आदी उपस्थित होते. रंजन ठाकरे यांनी समाज आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे नमूद करून घरांसह इतर समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. तसेच शासनदरबारी समाजाचे प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले. डॉ. मुशरफ शाह व आयुब शहा यांनी विविध पुराव्यांचा दाखला देत समाजाच्या अडचणींवर मार्गदर्शन केले. यावेळी छप्परबंद मुस्लीम शाह समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्षपदी सलीमशाह सैय्यद, चांदवड तालुकाध्यक्षपदी जुबेर शाह, कार्याध्यक्षपदी वसीम कादरी, उपाध्यक्षपदी नजीर शाह व आरिफ हाजी शब्बीर, तालुका सेक्रेटरीपदी जाकीर शाह, तर तालुका संघटकपदी एकबाल इनामदार व अजमल शाह यांची नियुक्ती करण्यात आली. प्रास्ताविक जावेद कादरी यांनी केले. स्वागत जुबेर शाह, जाकिर भिकन शाह, आरिफ शाह व नजिर शाह यांनी केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी अहमद शाह, आतिक शाह, नवाज शाह, वासिम शाह, असलम शाह यांनी प्रयत्न केले.
Source link
प्रलंबित असलेल्या दाखल्यांवरून छप्परबंद शाह समाज आक्रमक:चांदवड येथील जिल्हास्तरीय मेळाव्यात संघटित लढा देण्याचा केला निर्धार