Headlines

प्रसूतीस आलेल्या मातेला पाच दिवसात दिले 29 युनिट रक्त:प्रसूतीनंतर गंभीर मातेसाठी रक्तदाते, रुग्णसेवक, रक्तपेढी अधिकारी-कर्मचाऱ्यांची धडपड‎



मेळघाटच्या अतिदुर्गम भागातून प्रसूतीसाठी येथे आलेल्या एका मातेची प्रकृती गंभीर झाली. तिच्या उपचारांसाठी पाच दिवसांत २९ रक्त व रक्तघटकांची गरज भासली. अशा वेळी नातेवाईकांपुरते मर्यादित न राहता रक्तदाते, आशावर्कर, रुग्णसेवक, इर्विनच्या रक्तपेढीतील अधिका

.

त्यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि प्रयत्नांमुळे मेळघाटातील मनीषा धांडे यांच्या उपचारांना मोठी मदत मिळाली. या घटनेने रक्तदान हे दान नसून, एखाद्याच्या आयुष्याला नव्याने श्वास देणारी माणुसकीची चळवळ असल्याचे अधोरेखित केले आहे. मेळघाटातील मनीषा धांडे या प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांनी एका बाळाला जन्म दिला. मात्र प्रसूतीनंतर त्यांचे प्लेटलेट काउंट कमी झाले. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. ३ ऑगस्टला दुपारी त्यांना पुढील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले. प्लेटलेट्स वाढवण्यासह रक्तघटक उपलब्ध करून देणे ही गरज होती. रुग्णाची गंभीर अवस्था लक्षात घेऊन जिल्हा रुग्णालयाच्या रक्तकेंद्रातील जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, समुपदेशक योगेश पानझाडे यांनी रक्तघटक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मेळघाटातील आशा वर्कर बबिता बावणेकर यांच्या माध्यमातून संभाव्य रक्तदात्यांशी संपर्क साधला. परिस्थितीची माहिती मिळताच महात्मा ज्योतिबा फुले ब्लड डोनर ग्रुपसह अनेक रक्तदाते मदतीसाठी पुढे आले. त्यासोबतच शहरातीलही रक्तदात्यांनी विविध रक्तघटक उपलब्ध करून देण्यासाठी योगदान दिले. या घटनेने रक्तदान हे दान नसून, एखाद्याच्या आयुष्याला नव्याने श्वास देणारी माणुसकीची चळवळ असल्याचे अधोरेखित केले आहे. मेळघाटातील मनीषा धांडे या प्रसूतीसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाल्या होत्या.

या प्रयत्नांतून मनीषा धांडे यांना १२ एफएफपी, १० प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट , ५ पीसीव्ही, १ होल ब्लड, १ एसडीपी अशा २९ रक्त व रक्तघटकांची उपलब्धता केली.

रक्तपेढीतील प्रत्येक हाताची मोलाची साथ या प्रक्रियेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार, डॉ. प्रमोद निरवणे आणि डॉ. नरेंद्र सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तकेंद्राचे विभागप्रमुख डॉ. आशिष वाघमारे, डॉ. श्रीकांत झापर्डे, डॉ. अमित क्षार, डॉ. राहुल खराटे, डॉ. प्रफुल्ल पेंदाम, डॉ. प्रीती मोरे, डॉ. शेंद्रे, वैज्ञानिक अधिकारी सचिन काकडे, अविनाश जाधव, इतर वैज्ञानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे आणि समुपदेशक योगेश पानझडे यांनी रक्तदात्यांशी संपर्क, समन्वय आणि रक्तघटक उपलब्धतेसाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना रक्तकेंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण सहकार्य केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *