Headlines

फडणवीसांचे राजकारण ओहोटीला लागले:शहा इतके घाबरलेत की दिल्लीत घरासमोर सैन्य तैनात, सत्ताधाऱ्यांचा मेंदू ब्रिटिशांसारखा हललाय- संजय राऊत




देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला उतरती कळा लागलेली दिसते. आम्ही त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला दिल्लीत जाणार आहात तिथे आपले स्थान आहे.तर ते स्वत:च्या हाताने स्वत:चे नुकसान करुण घेत आहेत. कालचा मोर्च्यात हजारो लोकं एकत्र येत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी केली, हे काही रडगाणं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतात त्याला रडगाणं म्हणतात, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, लाखो लोकं रस्त्यावर उतरतात ते रडगाणं नाही तर क्रांती असते हे ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांना कळेल त्या दिवशी ते केंद्रामध्ये सर्वोच्च पदावर जातील आज तो पाइनलाइनमध्ये आहेत. शेलार हे आमचे मिद्ध आहेत पण त्यांनी सुद्धा चुकीचे विधाने करू नये. भाजप हा नेहमी लबाड कोल्ह्याच्या भूमिकेत असतो. त्यामुळे त्यांना सगळीकडे कोल्हेच दिसतात. ज्ञानेशकुमार सारखा माणसाविरोधात मोर्चा काढला ती भूमिका संपूर्ण देशातील लोकांची आहे. दिल्लीला छावणीचे स्वरूप संजय राऊत म्हणाले की, काल मुंबईमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला होता. कोल्ह्यांना वाघांची गर्जना काय समजणार, त्यांच्या दृष्टीमध्ये दोष आहे. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संपूर्ण देशभरात आंदोलन सुरू आहे. दिल्लीला सैन्य छावणीचे स्वरूप आले आहे. अमित शहा इतके घाबरले आहेत की दिल्लीमध्ये त्यांच्या घराजवळ सैन्यदल आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. कपिल सिब्बल सारखे मोठे वकील रस्त्यावर उतरले आहेत, सत्ताधारी त्यांची मस्करी करत आहेत. सत्ताधाऱ्यांचे मानसिक संतूलन बिघडले संजय राऊत म्हणाले की, देशात जे क्रांतीचे वातवरण निर्माण झाले आहे त्यामुळे देशातील सत्ताधाऱ्यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. अखेरच्या काळात 1942 मध्ये ब्रिटीशांचे अशाच प्रकारे मानसिक संतूलन बिघडले होते. ते सुद्धा आजच्या सत्ताधाऱ्यांप्रमाणेच वागत होते. 1942-43 नंतर ब्रिटीशांचा मेंदू हलला होता, तसाच मेंदू सत्ताधाऱ्यांचा हलला आहे. निवडणूक आयोगाने विरोधकांवर अन्याय केला संजय राऊत म्हणाले की, उद्या देशभरातीलइ विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. निवडणूक आयोगाने आम्हाला भेट दिली पाहिजे. देशभरातील विरोधी पक्षांवर निवडणूक आयोगाने अन्याय केला आहे. हक्क डावलले आहेत. काही ठिकाणी भाजपला मदत होईल अशी भूमिका घेतली आहे. हे ही वृत्त वाचा अहिल्यानगरात आई-वडिलांनी मिळून‎ केला मुलाचाच खून‎:व्यसनावरून झाला वाद, मृतदेह जाळून पुरावा नष्ट‎
अहिल्यानगर‎ जिल्ह्यातील तालुक्यातील गुणवडी शिवारात‎ दारूच्या व्यसनावरून झालेल्या ‎वादातून आई-वडिलांनी आपल्या ‎मुलाला लाकडी दांडक्याने बेदम ‎मारहाण केली. यात गंभीर जखमी‎ होऊन उपचारांविना त्याचा मृत्यू‎ झाला. त्यानंतर पुरावा नष्ट ‎करण्यासाठी आई-वडिलांनी ‎मृतदेह शेतात नेऊन जाळल्याची ‎घटना उघडकीस आली आहे.‎ प्रवीण प्रकाश लांडगे (वय ‎अंदाजे 25) असे मृत तरुणाचे ‎नाव आहे. या प्रकरणी त्याचे‎ वडील प्रकाश लांडगे आणि आई ‎आशा लांडगे (रा. गुणवडी)‎ यांना ताब्यात घेतले आहे, असे ‎एपीआय गणेश वारुळे यांनी‎ सांगितले.‎ वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *