Headlines

बसमध्ये महिलेची छेड; व्हिडिओ व्हायरल:अहिल्यानगरला ‘रास्ता रोको’, आमदार जगताप यांचा ट्रॅव्हल जिहादचा आरोप




अहिल्यानगर-पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम कंडक्टरने हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका जगताप यांनी घेतली. तासाभराने कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याची प्रत जगताप यांना दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात महापौर ज्योती गाडे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीचे सर्व नगरसेवक व नगरसेविका सहभागी झाले. अश्लील कृत्य केल्याप्रकरणी वाहक नूर मोहंमद सिराज पटेल याच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ७ एप्रिल २०२६ रोजी चालत्या बसमधील हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *