![]()
पुणे: ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांना मारहाण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा गुन्हा काळेपडळ पोलिस ठाण्यात नोंदवला गेला. डॉ. गायकवाड यांनी ‘कला आविष्कार महोत्सवा’चे आयोजन केले होते. दिव्या शिंदेला या कार्यक्रमासाठी आमंत्रण किंवा प्रसिद्धी करार नव्हता. तरीही, ऑगस्टपासून दिव्या शिंदे आणि तिच्या साथीदारांनी डॉ. गायकवाड यांच्याकडे फोन व मेसेजद्वारे पाच लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्याने 24 सप्टेंबर रोजी रात्री दिव्या शिंदे, आप्पा दुम्हेरे आणि आठ जण डॉ. गायकवाड यांच्या घरी घुसले. त्यांनी डॉ. गायकवाड यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने धारदार हत्याराने डोक्यावर वार केल्याचाही आरोप आहे. या मारहाणीत डॉ. गायकवाड गंभीर जखमी झाले असून, त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करत आहेत.
Source link
बिग बॉस फेम दिव्या शिंदेवर डॉक्टरांना मारहाण, खंडणीचा आरोप:पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची तक्रार, 8 जणांवर गुन्हा