Headlines

बिबट्यांचा वावर वाढल्याने वनविभाग सतर्क‎:देवठाणमध्ये नागरिक अन् विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे!




परिसरात ऊस, गिन्नी गवत, फळझाडे आणि डोंगराळ भागामुळे बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्री लहान मुलांना एकटे अंगणात खेळू देऊ नये, जनावरांचे गोठे मजबूत व बंदिस्त ठेवावेत. विद्यार्थ्यांनी शाळेत येताना-जाताना समूहाने यावे. कुठेही बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन संगमनेर येथील सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार यांनी केले. वनविभाग, ग्रामपंचायत देवठाण आणि देवठाण येथील जनसेवा ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील देवठाण येथे जागतिक व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वन्यजीव संवर्धनाबरोबरच नागरी वस्तीतील बिबट्याच्या वावराबाबत नागरिकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक अमरजीत पवार बोलत होते. यावेळी सरपंच विजया सहाणे, वनक्षेत्रपाल पी. एस. डोंगरे, विवेक दातीर, सी. एम. सहाणे उपस्थित होते. बिबट्यासमोर आल्यास पळू नये, शांत उभे राहून हात वर करून स्वतःचा आकार मोठा दाखवावा. रात्री टॉर्च, काठी जवळ ठेवावी, मोबाइलवर आवाज ठेवावा आणि समूहाने प्रवास करावा. घराजवळील झुडपे व कचरा साफ ठेवावा जेणेकरून भटक्या कुत्र्यांची संख्या वाढणार नाही याची दखल घेण्याबाबतच्या महत्त्वपूर्ण सूचना आरवायडीईएसचे संचालक विवेक दातीर यांनी दिल्या. दैनंदिन जीवनात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी अशा जनजागृती मोहिमा वनविभागामार्फत भविष्यातही राबविल्या जातील, असे अरुण शेळके यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *