Headlines

बीज सम्राट, सम्राज्ञी स्पर्धा पोस्टरचे अनावरण‎:निसर्गकट्टा तसेच सामाजिक वनीकरण विभागाचा संयुक्त उपक्रम‎




प्रतिनिधी | अकोला विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवण्यासाठी निसर्गकट्टा आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बीज सम्राट व साम्राज्ञी स्पर्धा–२०२६’ या उपक्रमाच्या पोस्टरचे नुकतेच उत्साहात विमोचन करण्यात आले. सामाजिक वनीकरण विभागाच्या कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात विभागीय वन अधिकारी रोहित चोबे, तिक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीचे प्रतिनिधी संजय सेंगर, निसर्गकट्टाचे अमोल सावंत तसेच डॉ. प्रदीप अवचार यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक वृक्षांच्या बियांचे संकलन व वर्गीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीचा सकारात्मक उपयोग करत परिसरातील विविध झाडांच्या बिया गोळा करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही स्पर्धा १ मे ते १ जून या कालावधीत आयोजित करण्यात आली असून, सर्वाधिक विविध प्रजातींच्या बिया संकलित करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘बीज सम्राट व साम्राज्ञी-२०२६’ हा मानाचा किताब प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रथम पाच विजेत्यांना प्रत्येकी १००० किमतीचे शालेय साहित्य पारितोषिक स्वरूपात देण्यात येणार आहे. स्पर्धा पाचवी ते नववीमधील विद्यार्थ्यांसाठी खुली असून, प्रत्येक प्रजातीच्या किमान पाच बिया संकलित करून दिलेल्या पाकिटामध्ये जमा करण्याचे नियम निश्चित करण्यात आले आहेत. संकलित बियांच्या माध्यमातून पुढे ‘सीड बँक’ उभारण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या जनजागृती उपक्रमाला अदु तिशु प्रॉडक्शन अँड म्युझिक प्रस्तुत आणि सुगत वाघमारे निर्मित “आऊट ऑफ सिलॅबस- पुस्तकांच्या पलीकडे’ या चित्रपटाच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभले आहे. पर्यावरण जागृतीमध्ये या चित्रपटाचा मोलाचा वाटा अधोरेखित करण्यात आला. तसेच तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटी ही सहयोगी संस्था म्हणून निसर्गकट्टा सोबत कार्यरत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *