Headlines

पालघरमध्ये मैदानात आढळला धड नसलेला मानवी सांगाडा:खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास आला, पोलिसांकडून तपास सुरू




पालघर जिल्ह्यातील वसई येथील आनंद नगर परिसरात एका मैदानात धड नसलेला मानवी सांगाडा आणि मानवी कवटी सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी संध्याकाळी काही मुले मैदानावर खेळत असताना त्यांना हे मानवी अवशेष दिसले, त्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपास चक्रावेगवान केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या आनंद नगर भागातील एका मैदानात रविवारी संध्याकाळी मुले नेहमीप्रमाणे खेळत होती. खेळता खेळता मुलांचे लक्ष एका कोपऱ्यात पडलेल्या हाडांकडे गेले. जवळ जाऊन पाहिले असता तो धड नसलेला मानवी सांगाडा आणि बाजूलाच पडलेली मानवी कवटी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मुलांनी तातडीने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली आणि त्यानंतर वसई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीच्या घटनांशी संबंध? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मैदानात हे मानवी अवशेष सापडले आहेत, तिथे गेल्या तीन दिवसांपासून कचरा किंवा गवत जळण्याच्या लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत होत्या. या लागलेल्या आगीचा आणि सापडलेल्या मानवी अवशेषांचा काही संबंध आहे का? पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला होता का? या दिशेने आता पोलीस तपास करत आहेत. घटनास्थळी सापडली नाणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, तिथे काही जुनी नाणी देखील सापडली आहेत. पोलिसांनी मानवी सांगाडा आणि कवटी ताब्यात घेऊन अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये (न्यायवैद्यक प्रयोगशाळा) पाठवली आहे. फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत व्यक्तीची ओळख, लिंग आणि मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची (ADR) नोंद केली आहे. मात्र, ही हत्या करून मृतदेह तिथे टाकण्यात आला की अन्य काही प्रकार आहे? याचे गूढ कायम आहे. हे ही वाचा… सावरकरांनी विदेशी कापडांची होळी केली, तिथे नराधमांची होळी व्हावी:पुण्यातील मूक मोर्चात नसरापूर प्रकरणातील पीडित पित्याची मागणी पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात रविवारी भव्य ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. “ज्या पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परकीय कापडांची होळी केली, त्याच पुण्यात अशा नराधमांची होळी व्हावी,” अशा शब्दांत पीडितेच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी जनसागराचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *