Headlines

भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार:संतप्त जमावाकडून नराधमाला चोप, निषेधार्थ आज 'भंडारा बंद'




भंडारा शहरातून एक अत्यंत माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला आमिष दाखवून तिच्यावर सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्यात आला आहे. या भयंकर घटनेनंतर संपूर्ण भंडारा शहरात संतापाचा भडका उडाला असून, नागरिकांनी रस्त्यावर उतरत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आज संपूर्ण शहरात ‘भंडारा बंद’ची हाक देण्यात आली आहे. नेमकी घटना काय घडली? मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात ही धक्कादायक घटना घडली. रोहित वासनिक (वय ३०) या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने एका ३ वर्षीय बालिकेला फूस लावून परिसरातील सार्वजनिक शौचालयात नेले. तिथे त्याने या चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घाबरलेल्या बालिकेने जोरजोरात आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या नागरिकांचे लक्ष वेधले गेले. नागरिकांचा प्रसंगावधान आणि आरोपीला चोप चिमुकलीचा आवाज ऐकून संतप्त नागरिकांनी तात्काळ शौचालयाकडे धाव घेतली आणि आरोपी रोहित वासनिक याला रंगेहाथ पकडले. संतापाच्या भरात जमावाने या नराधमाला जागेवरच बेदम मारहाण केली. जमावाच्या या मारहाणीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि सुटण्यासाठी आरोपीने तिथे पडलेल्या एका टाइल्सच्या तुकड्याने स्वतःलाच मारहाण करत जखमी करून घेतले. मेडिकल कॉलेजबाहेर ७ तासांचा थरार या घटनेनंतर जखमी चिमुकलीला आणि मारहाणीत जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेची बातमी शहरात पसरताच शेकडो संतापलेले नागरिक रुग्णालयाबाहेर जमा झाले. “या नराधमावर कोणतेही उपचार करू नका, त्याला आमच्या स्वाधीन करा,” अशी आक्रमक भूमिका घेत जमावाने रुग्णालयातच ठिय्या दिला. सलग ७ तास चाललेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमुळे वैद्यकीय महाविद्यालय परिसरात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी शहर पोलीस, राखीव दल आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमधून अतिरिक्त कुमक तातडीने तैनात करण्यात आली. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला वाढता तणाव लक्षात घेता, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक मोरे, उपविभागीय अधिकारी तिखे आणि मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. दुधगावकर यांनी संतप्त जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर कठोर कलमांन्वये कारवाई केली जाईल आणि त्याला कडक शिक्षा मिळवून दिली जाईल, असे ठोस आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास नागरिकांचा राग काहीसा शांत झाला. आज कडकडीत ‘भंडारा बंद’ या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज ‘भंडारा बंद’ पुकारण्यात आला आहे. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा आणि दुकाने आज बंद ठेवण्यात आली आहेत. या प्रकरणाचा खटला ‘फास्ट ट्रॅक कोर्टात’ चालवण्यात यावा आणि भंडारा जिल्ह्यातील कोणत्याही वकिलाने या नराधम आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, अशी आक्रमक मागणी संतप्त भंडारावासीयांकडून केली जात आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत. हेही वाचा.. OBC राजकारणात नवा टर्निंग पॉइंट: जातनिहाय जनगणना का महत्त्वाची? मंडल यात्रा आणि महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे कशी बदलली! भारतात ‘जातनिहाय जनगणना’ हा विषय पुन्हा एकदा देशाच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर अत्यंत तीव्रतेने ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेला तत्त्वतः मंजुरी दिल्यानंतर, महाराष्ट्रात ओबीसी संघटना आणि राजकीय नेत्यांनी या प्रक्रियेला गती देण्याची मागणी लावून धरली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली भंडारा येथून विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये ‘5वी मंडल जनगणना यात्रा’ सुरू झाली असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *