Headlines

भारतातील मधुमेहाचे वेगळे रूप:डायबिटीजच्या 78% रुग्णांमध्ये ‘सेंट्रल ओबेसिटी’, तर 76% जणांमध्ये ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ची समस्या; अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष




भारतात दिवसेंदिवस वाढणाऱ्या मधुमेहाच्या (Diabetes) पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशातील तब्बल 78 टक्के मधुमेही रुग्णांमध्ये ‘सेंट्रल ओबेसिटी’ (पोटाभोवती चरबी जमा होणे), तर 76 टक्के रुग्णांमध्ये ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ (Insulin Resistance) ही प्रमुख वैशिष्ट्ये आढळून येतात. डॉ. रेड्डीज आणि नेस्ले हेल्थ सायन्सच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या एका नव्या संशोधनातून हा निष्कर्ष समोर आला असून, हे संशोधन Diabetes, Metabolic Syndrome Obesity या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे. या संशोधनासाठी देशभरातील 60 एंडोक्राइनोलॉजिस्ट आणि डायबेटोलॉजिस्ट यांच्याशी चर्चा करून भारतीय रुग्णांमधील मधुमेहाचे स्वरूप आणि त्यांच्या आहाराच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला. संशोधनातील प्रमुख आणि महत्त्वाचे निष्कर्ष: आहारातील कमतरता आणि कार्बोहायड्रेट्सचे अधिक प्रमाण: सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल 82% तज्ज्ञांनुसार भारतीय रुग्णांमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. तसेच 75% तज्ज्ञांनी सांगितले की, भारतीय मधुमेही रुग्णांच्या आहारात प्रथिनांची (Protein) मोठी कमतरता असते. कमी ‘लीन मसल मास’ आणि आनुवंशिकता: 69% रुग्णांमध्ये स्नायूंचे प्रमाण (Lean Muscle Mass) कमी आढळले, तर 67% रुग्णांमध्ये आनुवंशिक घटकांमुळे मधुमेह झाल्याचे समोर आले. ‘डायबेसिटी’चे वाढते प्रमाण: 61% तज्ज्ञांच्या मते, त्यांच्याकडे येणाऱ्या मधुमेहाच्या रुग्णांपैकी निम्म्याहून अधिक रुग्ण ‘ओव्हरवेट’ किंवा लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत. मधुमेह आणि लठ्ठपणाच्या या एकत्रित समस्येला ‘डायबेसिटी’ (Diabesity) म्हटले जात आहे. डाएटचे पालन न करणे हे मोठे आव्हान: 25% पेक्षा जास्त रुग्ण 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ डॉक्टरांनी दिलेल्या डाएट चार्टचे काटेकोर पालन करत नाहीत, असे तज्ज्ञांनी नमूद केले. बीएमआयवरील अवलंबित्व आणि तपासणीतील त्रुटी: रुग्णांचे मूल्यमापन करताना 80% तज्ज्ञ अजूनही केवळ BMI (Body Mass Index) वर अवलंबून असतात. 62% डॉक्टर रुग्णांच्या 24 तासांच्या डाएटचा विचार करतात, तर केवळ 34% तज्ज्ञच शरीरातील चरबी (Body Fat) आणि स्नायूंच्या प्रमाणाची अचूक तपासणी करतात. डायबिटीज स्पेसिफिक न्यूट्रिशन फॉर्म्युला (DSNF) ची गरज: तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, केवळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे पुरेसे नसून रुग्णांना हाय प्रोटीन, हाय फायबर आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असलेला आहार देणे गरजेचे आहे. प्रत्येक रुग्णाची शारीरिक हालचाल, सांस्कृतिक सवयी, धार्मिक पसंती आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ‘वैयक्तिक पोषण धोरण’ (Personalized Nutrition Strategy) आखण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली. रुग्णांमध्ये एकाच वेळी वजन वाढणे आणि पोषणाची कमतरता असणे हे मोठे आव्हान आहे. डॉक्टरांनी केवळ कडक निर्बंध न लावता, रुग्णांना दैनंदिन जीवनात सहज अवलंबता येतील अशा आहारातील बदलांवर भर दिला पाहिजे.
– डॉ. बंशी साबू, मानद सचिव, डायबिटीज इंडिया भारतातील मधुमेहाचे स्वरूप वेगळे आहे. केवळ जागतिक मार्गदर्शक तत्त्वे वापरण्यापेक्षा भारतीय रुग्णांच्या गरजा आणि जीवनशैली लक्षात घेऊन पोषण धोरण ठरवणे गरजेचे आहे.
– डॉ. नंदन जोशी, हेड – मेडिकल अँड सायंटिफिक अफेयर्स, डॉ. रेड्डीज नेस्ले हेल्थ सायन्स



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *