Headlines

Sanjay Shirsat Targets Rohit Pawar Over Farmer Issues


रोहित पवारांनी राजकीय भाषा वापरणे बंद केले पाहिजे. तुम्हाला जर शेतकऱ्यांची काळजी असेल तर आमच्याबरोबर या आपण एकत्र येत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू. तुमच्याकडे येऊन काय करायचे आहे? तुमच्यातील भांडण सोडवता सोडवता तुमच्या नाकीनऊ आले आहेत, त्यात भर का घालून

.

संजय शिरसाट म्हणाले की, रोहित पवार हा फार छोटा माणूस आहे. निवडणूक आयोगाच्या विषयाची चर्चा देशभरात सुरू आहे. निवडणूक आयोगाबद्दल शंकेचे वातवरण असू नये ही प्रत्येकाची इच्छा असते. ज्या पद्धतीने आरोप होत आहे त्याला केंद्र सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कोणाची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणं गरजेचे आहे. केंद्र सरकार योग्य निर्णय घेईल.

तुम्ही पाकिस्तानेच एजंट का?

संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची डॉनसोबत तुलना करणे अत्यंत चुकीचे आहे. तुमच्या विजयी रॅलीमध्ये लोकं पाकिस्तानचे झेंडे घेऊन नाचत होते मग तुम्ही पाकिस्तानचे एजंट आहे का तर तुम्ही काय बोलणार. प्रश्नांचे गांभीर्य ओळखत माणसाने बोलले पाहिजे. निवडणूक आयोग, राष्ट्रपती यांना संविधानाच्या चौकटीतच काम करावे लागेल. ठाकरेंनी मातोश्री सोडून किमान दादरपर्यंत तरी जावे, आम्ही लोकांच्या बांधावर जात आहोत असा टोला शिरसाट यांनी लगावला आहे.

दोन दिवसांमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता

संजय शिरसाट म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज असल्याने प्रत्येकांने बांधावर जात परिस्थितीचा आढावा घ्यायचा असे मंत्रिमंडळ बैठकील ठरले. यातच सरकार शेतकऱ्यांच्या सोबत आहे त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये वाऱ्यावर सोडणार नाही, म्हणून प्रत्येक मंत्री बांधावर जात आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रू ढाळत शेतकऱ्यांना आपल्या व्यथा त्यांना सांगितल्या आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी धीर दिला असून दोन दिवसांमध्ये त्यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचे आहे. आम्ही सरसकट पंचनामे करणार आहोत.

शेतकऱ्यांना कमी लेखू नका

संजय शिरसाट म्हणाले की, शेतकऱ्यांना कमी लेखू नका, त्यांनी काय कायम फाटके कपडे घालायचे का? तो शेतकरी राजा आहे ना? त्यांच्या अंगावरचे चांगले कपडे सुद्धा रोहित पवारांना पाहावत नाही का? शेतकऱ्यांच्या भावना आणि वेदना समजून घेताना काही ठिकाणी सुरक्षेचा भाग म्हणून बॅरिकेट लावले तर त्यामध्ये काही गैर नाही. शेतकरी गरीबच दिसला पाहिजे म्हणून तशा कपड्यात फोटो काढायचे असतील तर विरोधकांनी तसे फोटो काढावे. पण शेतकरी आनंदी असला पाहिजे.

रोहित पवारांनी आमच्यासोबत यावे

संजय शिरसाट म्हणाले की, आचार संहिता लागली म्हणून आम्ही शेतकऱ्यांसाठी काही करायचे नाही का? शेतकऱ्यांना मरु द्यायचे का नाही तसे नसते. काही निर्णयासाठी आचारसंहिता नसते हे रोहित पवारांनी समजून घेतले पाहिजे. रोहित पवारांनी आमच्यासोबत यावे.

हे ही वृत्त वाचा

ज्ञानेश कुमार गृहमंत्र्यांचे छोटा शकील:निवडणूक आयोगातून लोकशाहीची हत्या सुरू, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही- राऊत

ज्ञानेश कुमार हे केंद्रीय गृहमंत्र्यांचे छोटा शकील आहेत, मग इतरांना काय म्हणायचे ते तुम्ही ठरवा. पण अमित शहांच्या निवडणूक आयोगातील छोटा शकीलकडून लोकशाहीची हत्या करण्याचे काम सुरू आहे, त्यांना राजीनामा देत घरी जावे लागेल, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.