Headlines

'भीमा तुझ्या जन्मामुळे' चित्रपटाचे वरूडमध्ये स्वागत, पोस्टर लॉन्च:फुले-शाहू-आंबेडकर कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत; दिग्दर्शकाने पोहोचवण्यासाठी मदत मागितली




‘भीमा तुझ्या जन्मामुळे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकांसह कलाकारांचे वरूडमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत झाले. शहरातील पांढुर्णा चौकातील श्रीकृष्ण प्लाझा येथील ‘हॉटेल क्रेझी डाईन इन’ येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटाच्या पोस्टरचे सामूहिक लॉन्चिंगही करण्यात आले. फुले-शाहू-आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वरूडचे नगरसेवक प्रवीण सावरकर अध्यक्षस्थानी होते. दुर्गा हरले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ॲड. संतोष खवले आणि प्रा. प्रवीण बोंद्रे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. चित्रपटातील मुख्य अभिनेता श्रीवेश देशमुख, सहअभिनेत्री आर्या तभाने, सहअभिनेता सागर वाघमारे, कार्यकारी निर्माता वंश तांदळे आणि अभिनेता महेश वाघमारे हे उपस्थित होते. दिग्दर्शक ॲड. संतोष खवले यांनी हा चित्रपट जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *