Headlines

भूमिगत केबलमध्ये बिघाड, 4 गावांत वीज गुल:शेतकऱ्यांचा मोर्चाचा इशारा, देवगाव फाटा ते वाकद फाट्यापर्यंत विद्युत खांब उभारण्याची नागरिकांची मागणी



तालुक्यातील कानळद येथे ३३/११ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र सुरू झाले. मात्र, देवगाव येथून येणाऱ्या ३३ केव्ही भूमिगत केबलमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने कोळगाव, कानळद, शिरवाडे आणि वाकद या गावांचा वीजपुरवठा विस्कळीत होत आहे.

.

देवगाव फाटा ते वाकद फाट्यापर्यंत विद्युत खांब उभारून वीजवाहिनी टाकावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पुन्हा वीजपुरवठा खंडित झाल्यास कानळद सबस्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून हे उपकेंद्र सुरू झाले आहे.संबंधित वीज वितरण विभागाने या मागणीची दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. खोदकामात तुटलेली भूमिगत केबल.

राज्यमार्ग क्रमांक ७ च्या कडेला भूमिगत केबल टाकण्यात आली आहे. सध्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू असून, जेसीबीमुळे केबलचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. केबलमधील बिघाड शोधून दुरुस्ती करण्यास वेळ लागत असल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास विलंब होतो. यापूर्वी वीजपुरवठा तब्बल ७२ तास, तर अनेकदा २४ तासांपर्यंत खंडित राहिला आहे.

^दोन्ही विभागांत समन्वयाचा अभाव. खोदकामावेळी प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याची वीज वितरण कंपनीची मागणी आहे, तर केबल हलविण्याची जबाबदारी आपली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे.- सागर कोते, सहाय्यक पोलिस निरीक्षक, लासलगाव

चार गावांतील नागरिक आणि शेतकरी त्रस्त वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने घरगुती ग्राहक, व्यावसायिक आणि शेतकऱ्यांच्या कामकाजावर परिणाम होत आहे. गावठाण फिडर सेपरेशन योजनेचे कामही वाकद फाट्यानजीक एका शेतकऱ्याने खांब उभारण्यास हरकत घेतल्याने रखडले आहे. त्यामुळे चार गावांना योजनेचा लाभ मिळालेला नाही.

^केबल रस्त्याच्या हद्दीत परवानगीशिवाय टाकली. खोदकामावेळी कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित राहत नसल्याने कामगारांच्या जीविताला धोका आहे. नुकसानीची जबाबदारी वीज वितरण कंपनीची असेल. – श्याम निकम, ठेकेदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *