![]()
अंबानेर शिवारातील हॉटेल मल्हार येथे बनावट विदेशी मद्य तयार करून विक्रीसाठी साठा केल्याचा प्रकार वणी पोलिसांनी उघडकीस आणला. पोलिसांनी छापा टाकून मद्याच्या ६९९ सिलबंद बाटल्या, २० लिटर रसायन, रिकाम्या बाटल्या, दारू निर्मितीचे साहित्य, कार आणि मोबाइल असा एकूण ३ लाख ९१ हजार ७४६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सुमित अशोक कदम (३२, रा. कोराटे, ता. दिंडोरी) आणि ज्ञानेश्वर नंदू नाठे (रा. निलवंडीपाडा, ता. दिंडोरी) यांच्याविरुद्ध वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी रात्री एकच्या सुमारास अंबानेर शिवारातील हॉटेल मल्हार येथे ही कारवाई करण्यात आली. { उर्वरित पान २ पोलिसांनी कारवाईत २० लिटर रसायनाचा कॅन, रिकाम्या बाटल्या, दारू निर्मितीचे साहित्य, अल्टो कार आणि मोबाइल जप्त केला. यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
Source link
बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त 3.91 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त:अंबानेरमध्ये वणी पोलिसांची धडक कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल