![]()
भोसरी परिसरात शनिवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत तीन लाकडी वखारींसह एका रसायन कंपनीला आग लागून मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत चारही कंपन्यांमधील साहित्य, यंत्रसामग्री आणि माल जळून खाक झाला. आगीत सुमारे ५३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, संबंधित चारही कंपन्यांकडे अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र (फायर एनओसी) आणि विमा नसल्याची बाब समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता आणि परिसरातील ज्वलनशील साहित्य लक्षात घेता नऊ अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल करण्यात आले. ५२ अग्निशमन जवानांनी तब्बल दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले होते. त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीचा धोका आसपासच्या निवासी भागालाही निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. परिसरातील तीन कुटुंबांतील सर्व रहिवाशांना सुरक्षित ठेवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर औद्योगिक आस्थापनांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चारही कंपन्यांकडे अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र नसणे आणि मालमत्तेचा विमाही उतरवलेला नसणे, ही बाब गंभीर मानली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू असून, सुरक्षाविषयक नियमांचे पालन झाले होते का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. ——- हेही वाचा.. मनोज जरांगेंच्या सांगण्यावरूनच भ्याड हल्ला!:रेखा कोंडे यांचा खळबळजनक आरोप; मारणे गँगशी कनेक्शन आणि शरद मोहोळची बहीण म्हणत जीवे मारण्याची धमकी
पुण्यातील टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेत शुक्रवारी (20 नोव्हेंबर) रात्री पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) महिला आघाडीच्या पुणे शहराध्यक्षा आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्षा रेखा कोंडे यांना झालेल्या मारहाण प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले आहे. या घटनेनंतर शनिवारी (21 नोव्हेंबर 2026) रेखा कोंडे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि हल्लेखोर महिलांवर गंभीर आरोप केले आहेत. “मनोज जरांगे यांना 500 कोटींच्या क्लिपच्या एसआयटी चौकशीबाबत प्रश्न विचारल्याचा राग धरूनच त्यांच्या समर्थक महिलांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. विशेष म्हणजे, निमंत्रण नसताना कार्यक्रमात घुसून ‘माझे मारणे गँगशी कनेक्शन आहे, मी शरद मोहोळची बहीण आहे, तुला संपवून टाकीन,’ अशी धमकी देण्यात आली,” असा खळबळजनक गौप्यस्फोट रेखा कोंडे यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link