Headlines

मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली जमिनीची मागणी:आ. ओगले यांच्यासह शिष्टमंडळाने घेतली भेट




आमदार हेमंत ओगले यांच्यासह शेतकरी शिष्टमंडळाने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन विविध प्रयोजनांसाठी जमिनीची मागणी केली आहे. आ. ओगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांच्यासह अनेकांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. कृषी उत्पन्न बाजार समिती, श्रीरामपूरला जमीन मिळावी, श्रीरामपूर तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची ऐनतपूर व बेलापूर बुद्रुक येथील जमीन स्थानिक शेतकऱ्यांना द्यावी, श्रीरामपूर येथील अतिक्रमण विरोधी मोहिमेत विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे नगरपरिषदेच्या हद्दीतील गट क्रमांक ७५ व ७६ पैकी आरक्षण क्रमांक १४ आठवडा बाजार व व्यापारी संकुल क्षेत्र ३.०० या जागेत पुनर्वसन करावे, तालुक्यातील क्रीडा संकुलासाठी मौजे बेलापूर बुद्रुक हद्दीतील ऐनतपूर येथील शेती महामंडळाची जागा हस्तांतरित करावी, मौजे माळेवाडी या गावासाठी मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी मिळावी, श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने मिळावी, टिळकनगर मळ्या अंतर्गत मौजे उक्कलगाव येथील आराखड्याबाहेरील सर्व्हे नंबर २९५ मधील क्षेत्र वाटपास उपलब्ध करून देण्यात यावे, श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण, सराला, गोवर्धन, महाकाळवडगाव, कमालपूर, खानापूर आणि भामाठाणा या सात गावांतील पात्र अतिक्रमणधारकांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *