![]()
नांदगाव बाजार समितीच्या सभापतिपदी मोरझर येथील समाधान पाटील तर उपसभापतिपदी पिंप्रीहवेली येथील अनिल वाघ यांची अविरोध निवड झाली. सभापती एकनाथ कारभारी सदगीर व उपसभापती यज्ञेश रामनिवास कलंत्री यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने बाजार समितीच्या कार्यालयात शनिवारी सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी सहाय्यक निबंधक अर्चना सौंदाणे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी समाधान आनंदराव पाटील व उपसभापती पदासाठी अनिल आप्पासाहेब वाघ यांचे प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने त्यांची अविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. सभापती पदाच्या नामनिर्देशन पत्रावर संचालक सतीश बोरसे यांनी सूचक म्हणून तर जिवन गरुड यांनी अनुमोदक म्हणून सही केली. तसेच उपसभापती पदाच्या नामनिर्देशन पत्रावर पोपट सानप यांनी सुचक म्हणून तर दीपक मोरे यांनी अनुमोदक म्हणून सही केली. सभापती निवडीपूर्वी संचालक मंडळाची शिवनेरी सभागृह येथे बैठक होवून संस्थेचे मार्गदर्शक तथा आमदार सुहास कांदे, अंजुमताई कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे , माजी आमदार अनिलदादा आहेर , विलासभाऊ आहेर , यांच्या प्रमुख उपस्थितीत सभापती पदावर समाधान पाटील तर उपसभापती पदावर आप्पासाहेब वाघ यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीवेळी संचालक तेज कवडे, साहेबराव पगार, अर्जुन पाटील, दर्शन आहेर, अनिल सोनवणे, गोकुळ कोठारी, नीलेश इपर, नगराध्यक्ष सागर हिरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Source link
नांदगाव बाजार समिती सभापतिपदी पाटील:उपसभापतिपदी अनिलवाघ यांची निवड