Headlines

मनमाडला मराठा समाजाचे उपोषण; आज चक्काजाम:मनोज जरांगे यांच्या आंदाेलनाला पाठिंबा; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार‎



मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाडमधील सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत शुक्रवारपासून शहर

.

दरम्यान, आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून शनिवारी (दि.५) दुपारी १२ वाजता मनमाड-शिर्डी राज्य मार्गावरील जयश्री टॉकीजसमोर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेला हा निर्णायक लढा असून जरांगे पाटील यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांवर शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत मनमाडमधील साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला.

आंदोलनाची पुढील दिशा म्हणून शनिवारी दुपारी १२ वाजता जयश्री टॉकीजसमोर मनमाड-शिर्डी राज्य मार्गावर चक्काजाम करण्यात येणार आहे. यात मनमाडसह नांदगाव, येवला व परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजबांधवांनी शांततेत आणि मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *