Headlines

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 20 वा दिवस:सरकारचे शिष्टमंडळ पहाटेच बीडमध्ये दाखल, आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही- जरांगे




मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेली 20 दिवस उपोषणाला बसले आहेत. यात सलाईन आणि पाणी बंद केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. बीडच्या पाटोद्यात जरांगे यांच्या वडीलांनी त्यांची भेट घेतली. महंत शिवाजी महाराज यांच्या विनंतीतनंतर जरांगे यांनी सलाईन घेतले. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ पहाटेच दाखल झाले. यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस दाखल झाले होते. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की आंदोलन पूर्ण यशस्वी झाल्याशिवाय आपण थांबवणार नाही असे मी सांगितले होते. आपल्याकडे सातारा, कोल्हापूर गॅझेटसाठी वेळ द्या म्हणतात. सरकार फसवते असे वाटते पण त्यांना 3 महिने देत सरकारला शेवटची संधी देऊ. 90 दिवसात काही फरक पडणार नाही. 58 लाख नोंदी कमी करायच्या नाही हे सरकारने सांगितले आहे. यापूढे सर्व सर्कलला बैठका घ्या, आंदोलन सगळ्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही. हैदराबाद गॅझेटसाठी एकही दिवस देण्यात येणार नाही. …हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *