Headlines

मराठवाड्यात दुष्काळानंतर कामांचाही दुष्काळ‎:30 टक्के "ग्रापं''त ‘व्हीबी‎जीरामजी''ची कामेही बंद‎




मराठवाड्यात पीक हंगामाच्या ‎‎दुष्काळानंतर आता कामांचाही‎दुष्काळ असल्याचे चित्र आहे.‎आठही जिल्ह्यांतून व्हीबी जीरामजी ‎‎योजनेमध्ये ६८०५ पैकी २१०१,‎म्हणजेच ३० टक्के ग्रामपंचायतींमधून ‎‎कामेच उपलब्ध झाली नाहीत. यावर्षी ‎‎दुष्काळामुळे शेतात कामे नाहीत. ‎‎योजनेचीही कामे नसल्याने मजुरांवर ‎‎उपासमारीची वेळ येण्याची भीती‎व्यक्त केली जात आहे.‎ केंद्र शासनाने पूर्वीच्या महाराष्ट्र ‎‎ग्रामीण रोजगार हमी योजनेचे नाव‎बदलून आता व्हीबी जीरामजी योजना‎असे केले आहे. योजनेचे नाव‎बदलले असले तरी कामांची पद्धत‎पूर्वीचीच आहे. गावपातळीवर‎मजुरांच्या हाताला काम मिळावे‎यासाठी सार्वजनिक व वैयक्तिक‎स्वरूपाची कामे सुरू करण्याच्या‎सूचना आहेत. यामध्ये प्रामुख्याने‎सिंचन विहीर, पाणंद रस्ते आदी‎कामांचा समावेश आहे.‎दरम्यान,कामे सुरू नसलेल्या‎सर्वाधिक ५८९ ग्रामपंचायती बीड ‎‎जिल्ह्यातील आहेत.‎ जिल्हानिहाय कामे सुरू‎नसलेल्या ग्रामपंचायती‎ मराठवाड्यातील ६८०५‎ग्रामपंचायतींपैकी २१०१‎ग्रामपंचायतींतून अद्यापही योजनेची‎कामे सुरू झालेली नाहीत. यात‎छत्रपती संभाजीनगर ८३, बीड ५८९,‎धाराशिव १८१, हिंगोली १७४,‎जालना १३८, नांदेड ४८३, परभणी‎३७०, लातूर ८३ ग्रामपंचायतींचा‎ समावेश आहे. पेमेंट झाले नसल्याने‎कामे सुरू दिसत नाही‎ अनेक वेळा मजुरांच्या मस्टरनुसार‎पेमेंट झाले नसेल तर त्या ठिकाणी‎कामे सुरू नाहीत, असे दिसून येते.‎मागणी आल्यानंतर कामे सुरू‎करणार . – राजेश सरवदे,‎उपजिल्हाधिकारी, हिंगोली पुढे काय‎: मजुरांसाठी ‘शेल्फ’वर‎कामे उपलब्ध होणार‎ प्रशासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीमधून‎किमान २० ते २५ कामे ‘शेल्फ’वर‎ठेवण्याची तयारी केली आहे.मागणी‎आल्यानंतर ही कामे सुरू होतील.‎‎‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *