Headlines

महात्मा फुले यांचे बहुजन वर्गाच्या उन्नतीसाठीचे योगदान अतुलनीय:महात्मा फुले जयंती कार्यक्रमात आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन‎



“क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या विचारांनी समाजाला नवदिशा दिली आणि समतेचा मार्ग दाखवला,” असे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले.

.

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त मंगळवेढा येथील माळी गल्ली येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे, भैरवनाथ शुगरचे चेअरमन अनिल सावंत यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सामाजिक जाणीव वाढते विद्यार्थ्यांनी भाषण व मनोगत सादर करत महात्मा फुले यांना अभिवादन केले. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढून त्यांना योग्य दिशा मिळते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रम प्रेरणादायी झााला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *