![]()
वेळापूर (ता. माळशिरस) येथील श्री बृहन्मठ या वीरशैव लिंगायत धर्मातील मोठ्या मठांपैकी एक असलेल्या मठाचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांचा अमृत महोत्सव विविध धार्मिक कार्यक्रम आणि भव्य मिरवणुकीने साजरा करण्यात आला. या महोत्सवानिमित्त मठाचे शिवाचार्य सदाशिव यांनी ३ दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी ध्वजारोहणाने शुभारंभ झाला. गुरुगादीस रुद्राभिषेक, गणेशयाग व महारुद्रयाग स्वाहाकार, भजन-कीर्तन, संगीत आणि नवचंडी याग पार पडले. सायंकाळी मुक्तेश्वर शिवाचार्य यांची नाणे, श्रीफळ, पेढा, दूध, गहू, गूळ व तांदूळतुला झाली. मिरवणूक आणि सुवर्ण पट्टाभिषेक सायंकाळी ७ वाजता पालखी मैदान, काळा मारुती मंदिर, व्यापारी पेठ ते श्री बृहन्मठ या मार्गावरून पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य अड्डापालखी व शिवाचार्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला. कलशधारी महिला, भजन, ढोल-ताशा आणि पारंपारिक नृत्याने मिरवणुकीची शोभा वाढवली. विद्युत बग्गी व छत्री आकर्षणाचे केंद्र ठरली.
Source link
वेळापुरमध्ये पालखी सोहळा आणि शिवाचार्यांची मिरवणूक उत्साहात:वेळापूरचे मुक्तेश्वर शिवाचार्य यांच्या अमृत महोत्सव