![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या पावन समाधीस्थळाजवळ असलेल्या स्कायब्रिज गृहप्रकल्पात सध्या आनंदी, प्रसन्न आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. मनोज व मुकेश छाजेड यांनी स्कायब्रिजच्या रूपाने अनेक जैन परिवारांना आपुलकीच्या धाग्याने एकत्र आणले आहे. या गृहप्रकल्पातील सर्व रहिवासी धार्मिक वृत्तीचे असून, परस्परांमध्ये स्नेहभाव आहे. येथील मंगलपाठ आणि प्रवचनात भाविक अत्यंत श्रद्धेने सहभागी होतात. हा गृहप्रकल्प एक ‘नंदनवन’ आहे, असे आचार्यांश्रींच्या शिष्या पूज्य कंचनकवरजी यांच्या शिष्या पूज्य सुयशाजी महासतीजी व पूज्य सुजयाजी महासतीजी म्हणाल्या. पूज्य सुयशाजी महासतीजी आणि पूज्य सुजयाजी महासतीजी यांचे गुरूपुष्यामृताच्या पावन मुहूर्तावर बुरुडगाव रोडवरील स्कायब्रिज गृहप्रकल्पात आगमन झाले. यावेळी स्कायब्रिज गृहप्रकल्प सोसायटीचे अध्यक्ष अमृतलाल कोठारी, मुकेश छाजेड, हिरालाल बलदोटा आदींसह सर्व रहिवाशांनी महासतीजींचे स्वागत केले. स्कायब्रिज परिवारासाठी साधू-साध्वीजींचे आगमन नेहमीच परमानंद देणारे असते. येथील प्रत्येक रहिवासी त्यांची सेवा करण्यात मग्न होतो. त्यांचे अनमोल मार्गदर्शन प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. महासतीजी मूळच्या मालेगाव येथील असून, त्यांच्या सहाही सख्ख्या बहिणींनी जैन दीक्षा घेतलेली आहे. त्यांचे हे शुभ आगमन आम्हा सर्वांसाठी चैतन्यदायी आहे, असे स्कायब्रिज सोसायटीचे अध्यक्ष अमृतलाल कोठारी म्हणाले.स्कायब्रिजचे प्रणेते मुकेश छाजेड म्हणाले, हा गृहप्रकल्प उभारताना केवळ इमारती उभा करणे हा उद्देश नव्हता, तर याठिकाणी एक अखंड भक्तीभाव निर्माण व्हावा हा मुख्य हेतू होता. येथे वेळोवेळी साधू-साध्वीजी भेट देऊन भाविकांना आशीर्वाद देतात. सर्व रहिवासी एकत्र येऊन जैन धर्मातील विविध सण, उत्सव उत्साहाने साजरे करत असून, याद्वारे नवीन पिढीमध्ये उच्च धार्मिक संस्कार रुजवण्याचे पवित्र काम केले जात आहे. महासतीजींच्या पावन सान्निध्यात प्रत्येकाला जीवन जगण्याची एक नवी आणि सकारात्मक दिशा मिळत आहे. त्यामुळे अहिल्यानगर शहरातील जास्तीत जास्त भाविकांनी बुरुडगाव रस्त्यावरील स्कायब्रिज येथे भेट देऊन पूज्य महासतीजी यांच्या दर्शनाचा व मंगल पाठाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते हिरालाल बलदोटा यांनी केले आहे.
Source link
महासतीजींच्या आगमनाने बुरुडगाव रस्त्यावर अवतरले जणू नंदनवन:मनोज व मुकेश छाजेड यांनी जैन परिवारांना आणले एकत्र; रहिवाशांच्या सेवेचे पूज्य सुयशाजींकडून कौतुक