![]()
प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या ‘महासाधना सप्ताह’ उपक्रमात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरीय सन्मानाने गौरवण्यात आले. मुंबईत मंत्रालयात पार पडलेल्या सोहळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक अनिता मेश्राम यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला. २ ते १० एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘महासाधना सप्ताह’ अंतर्गत आयजीओटी प्रशिक्षण, कर्मचारी नोंदणी, डिजिटल प्रशासन, प्रशिक्षणातील सक्रिय सहभाग आणि प्रभावी अंमलबजावणी या विविध निकषांमध्ये जिल्हा परिषद राज्यात ठळकपणे उठून दिसली. प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे अकोला जिल्हा परिषदेला हा मानाचा सन्मान प्राप्त झाला. गौरव सोहळ्यास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच अति मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. राज्यातील निवडक जिल्ह्यांपैकी अकोला जिल्हा परिषदेला मिळालेला हा सन्मान जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला. सांघिक परिश्रमाचे फळ सोहळ्यात बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी भावना व्यक्त केल्या. हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा नसून जिल्हा परिषद अकोल्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक परिश्रमाचा आणि समर्पणाचा सन्मान आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे आणि नियोजनबद्ध, समन्वयपूर्ण आणि प्रभावीपणे काम करत हा उपक्रम यशस्वी केला. प्रशासनाच्या थक परिश्रमामुळेच आज अकोला जिल्हा परिषदेला राज्यस्तरावर गौरव प्राप्त झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Source link
महासाधना सप्ताहात जि. प. ला राज्यात बहुमान:उत्कृष्ट कामगिरीबद्दल सीईओ मेश्राम यांचा सन्मानचिन्ह देऊन गाैरव