Headlines

मानसिक आरोग्य दिन‎:तणावमुक्त जीवनासाठी दररोज 5 मिनिटे बोला, बदलत्या जीवनशैलीने 18 ते 35 वयोगटात मानसिक ताण वाढला‎




धावपळीच्या जीवनशैलीत प्रत्येकाच्या‎आयुष्यात मानसिक ताण वाढताना दिसत‎‎आहे. मात्र, प्रत्येकाच्या‎‎या ताणामागील कारणे‎‎वेगवेगळी आहेत.‎‎विद्यार्थ्यांना भविष्याची‎‎चिंता, गृहिणींना‎‎घरातील वाढत्या‎‎जबाबदाऱ्या, तर‎‎शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या‎चिंतेचा सामना करावा लागत आहे. मानसिक‎ताणाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांमध्ये १८ ते ३५‎वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असून,‎दररोज विश्वासू व्यक्तीशी ५ मिनिटे संवाद‎साधावा, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आशिष‎मोहिते यांनी स्पष्ट केले.‎ आज जागतिक मानसिक आरोग्य दिन‎असून त्याअनुषंगाने डाॅ. मोहिते यांनी मानसिक‎आरोग्य सुदृढ कसे ठेवता येईल यावर उपाय‎सुचवले. अति ताण, कौटुंबिक समस्या,‎नातेसंबंधांतील अडचणी, सतत विचार करत‎राहणे आणि व्यसनाधीनता ही मानसिक‎आरोग्याशी संबंधित तक्रारींची मुख्य कारणे‎आहेत. मानसिक ताणाचा थेट परिणाम झोप,‎एकाग्रता, काम आणि वैयक्तिक संबंधांवर‎होतो. सतत विचार करणे, निराशा वाटणे,‎झोपेच्या सवयींमध्ये बदल होणे व कामात मन‎न लागणे ही लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास दुर्लक्ष‎करू नये. मोबाइल आणि सोशल मीडियाचा‎अति वापर केवळ तरुणांपुरता मर्यादित नसून‎ज्येष्ठ नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर दिसून‎येत आहे. त्यामुळे स्क्रीनचा वापर मर्यादित‎ठेवून वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक‎असल्याचेही त्यांनी सांगितले.‎ रात्री झोपण्यापूर्वी मोबाइलपासून दूर राहा‎ दररोज शारीरिक हालचालींसाठी वेळ काढा, विशेषतः‎रात्री झोपण्यापूर्वी मोबाइलपासून दूर राहा, विश्वासू‎व्यक्तीशी संवाद साधा किंवा तज्ज्ञांची मदत घ्या,‎नियमित आणि पौष्टिक अन्नाचे सेवन करा,‎नकारात्मक विचारात अडकण्याऐवजी विचारांना योग्य‎दिशा देणे गरजेचे आहे.‎
चिंता वाटणे, अस्वस्थता, चिडचिड होते‎ सतत चिंता वाटणे, अस्वस्थता, भूक किंवा झोपेचे‎प्रमाण बदलणे, एकाग्रता कमी होणे व चिडचिड वाढणे‎या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सध्या धावपळीच्या‎काळात अतिताण, कौटुंबिक समस्या, नातेसंबंधांतील‎अडचणी, सतत विचार करत राहणे आणि‎व्यसनाधीनता ही मानसिक आरोग्याशी संबंधित‎तक्रारींची मुख्य कारणे आहेत.‎ एक्स्पर्ट व्ह्यू‎: डाॅ. आशिष मोहिते,‎मानसोपचारतज्ज्ञ‎
वैद्यकीय उपचार गरजेचे‎ प्रत्येकाची ताण हाताळण्याची‎क्षमता वेगळी असते. ताणाचा‎अंदाज घेण्यासाठी होम्स आणि राहे‎स्ट्रेस स्केल यांसारख्या साधनांचा‎वापर केला जातो. जीवनशैलीतील‎बदल पुरेसे नसून ताणाचा परिणाम‎दैनंदिन आयुष्यावर होत असल्यास‎वेळेवर वैद्यकीय उपचार घेणे‎गरजेचे आहे. स्क्रीनिंग टाइम कमी‎करणे प्रत्येकाच्या हातात आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *