Headlines

मावेजा घोटाळा:154 पैकी 6 फाइल्स गहाळ; पाठक यांना 7 दिवसांची कोठडी, अधिकारांचा गैरवापर केल्याने पाठक यांना 50 हजार दंड




241 कोटींचा मावेजा घोटाळ्यात विशेष पथकाने अटक केलेले बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना शुक्रवारी बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. बचाव पक्षाने त्याला विरोध केला. न्यायालयाने 15 मे पर्यंत 7 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. दरम्यान, या प्रकरणातील 154 पैकी 6 फाइल्स मिसिंग असल्याचे पोलिसांनी न्यायालयात वेगळी आहेत. हे दुटप्पी धोरण आहे. 200 पानी सीडीआरमध्ये पाठकांचा एकही फोन नाही तर आवाजाचे नमुने का घ्यायचे आहेत. सह्यांचा अहवालावरुन अटक केली मात्र अहवाल काय हे सांगितले नाही. चौकशी अहवाल समोर आला नाही. मिसिंग 6 फाइल पाठक सोबत घेऊन गेले नाहीत. 5 जानेवारी 2026 रोजी आम्ही साक्षीदार म्हणून 10 पानी जबाब नोंदवला. 122 पैकी एकाही शेतकऱ्याने पाठकांना भेटल्याचे सांगितले नाही. 28 एप्रिलला आदेशाच्या नकला दिल्या तर 6 महिन्यांनंतर घोटाळा कसा झाला. सरकारी दरानेच मावेजा मंजूर केला. पैसे उपजिल्हाधिकारी देतात. पाठकांनीच लॅपटॉपवर मावेजाचे आदेश बनवले : तपास अधिकारी तपास अधिकारी व्यंकटराम : पाठक यांनी मावेजा आदेश स्वत:च्या लॅपटॉपवर तयार केले आहेत. लॅपटॉप जप्त करुन त्याची फॉरेन्सिक तपासणी गरजेची आहे. मुंबई, लातूर, पुणे येथे तपासासाठी जावे लागेल. 10 दिवसांची पोलिस कोठडी मिळावी. न्या. शिंदे : 15 मे पर्यंत सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली जात आहे. सरकारी वकील ॲड. सरवदे: या प्रकरणात इतर आरोपींशी संभाषण आहे.त्यासाठी आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. लवादाची एसओपी यात पाळली गेली नाही. फाइल क्रमांक 91, 92 व 93 यामध्ये 12 मार्च 2025 रोजीचे आदेश आहेत मात्र 28 मार्च रोजी रोजनामेलिहिलेले आहेत. पोलिस कोठडी हवी आहे. पाठकांचे वकील ॲड. थिगळे : अटकेची कारणे व रिमांडची कारणे सांगितले. पाठक यांनी स्वत:च्या लॅपटॉपवर हे मावेजाचे आदेश तयार केले आहेत. प्रकरणात पाठकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट करण्यासाठी 3 फाइल न्यायाधिशांसमोर सादर केल्या गेल्या. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता पाठक यांना बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. एस. आर. शिंदे यांनी 7 दिवसांची कोठडी सुनावली. सरकारी पक्षाकडून ॲड. योगेश सरवदे यांनी, तर पाठक यांच्यातर्फे ॲड. कालिदास थिगळे, ॲड. मिलिंद वाघिरकर यांनी युक्तीवाद केला. अधिकारांचा गैरवापर अधिकाऱ्याला 50 हजार रुपयांचा दंड : अधिकार नसताना जमिनीच्या वादात बेकायदा आदेश देणे धाराशिवचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना महागात पडले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती सिद्धेश्वर ठोंबरे यांनी त्यांच्यावर ताशेरे ओढत 50 हजार रुपयांचा वैयक्तिक दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम त्यांनी स्वतःच्या खिशातून छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *