![]()
करमाळा तालुक्यातील मांगी गाव नेहमीच सामाजिक आणि आदर्श उपक्रमामुळे चर्चेत राहिले आहे. याच परंपरेला पुढे नेत दि. १४ एप्रिल रोजी भारताचे संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘नाचून नाही, तर वाचून’ या संदेशानुसार अत्यंत साधेपणाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. १३ एप्रिल रोजी मध्यरात्री महामानवांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी केली आणि भीमगीतांचा आनंद घेत जन्मोत्सव साजरा केला. पंचशील बुद्ध विहार परिसरात सडा-रांगोळी काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. यावर्षी मिरवणूक व इतर खर्चाला फाटा देत बुद्ध विहाराच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक या आदर्श जयंती उपक्रमाबद्दल सुजित बागल यांनी आपल्या भाषणात कमिटीचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. मांगी गावातील या उपक्रमाचे करमाळा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. यावेळी मांगी गावातील नागरिकांसह घूमट वस्ती व राजवाडा परिसरातील भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
मिरवणुकीचा खर्च टाळत बुद्ध विहाराचे सुशोभीकरण:भाजप नेत्या रश्मी बागल यांच्याकडून अभिवादन