Headlines

मिरवणूक:हिराकाका प्रांगणात 3 तास भक्तामर स्तोत्र; 1 हजार भक्तांनी केले 48 कडव्यांचे पठण




विश्व भक्तामर दिनानिमित्त भक्ती आणि आध्यात्मिकतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. सकल जैन समाजातर्फे नवाबपुरा येथील हिराकाका प्रांगणात सामूहिक भक्तामर स्तोत्र पठण झाले. यात १ हजार भाविकांनी सहभाग घेतला. पहिल्यांदाच विनम्रसागर महाराजांच्या सान्निध्यात ४८ कडव्यांच्या भक्तामर स्तोत्राचे सामूहिक पठण केले. राजाबाजार खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत, पार्श्वनाथ मंदिर तसेच चातुर्मास संयोजन समितीतर्फे कार्यक्रम झाला. सकाळी राजाबाजार येथील दिगंबर जैन मंदिरापासून नवाबपुरा येथील हिराकाका प्रांगणापर्यंत मिरवणूक निघाली. मिरवणुकीत डोक्यावर मंगल कलश धारण केलेल्या २०० महिला सहभागी होत्या. मिरवणूक कार्यक्रमस्थळी पोहोचल्यानंतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. या वेळी राजाबाजार जैन मंदिराचे अध्यक्ष महावीर पाटणी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. पाटणी म्हणाले की, मागील वर्षीपासून भक्तामरची सुरुवात झाली. जितोच्या माध्यमातून ही सुरुवात झाली. या वर्षी भक्तामर गुरू विनम्रसागर महाराजांच्या सान्निध्यात हा दिवस साजरा होत आहे. भाविकांनी भक्तामर स्तोत्रातील ४८ कडव्यांचे पठण केले. भक्ती, साधना, शांती आणि विश्वकल्याणाची मंगलकामना केली. धार्मिक साधनेचे महत्त्व आणि आध्यात्मिक चिंतनाचा संदेश त्यांनी दिला. सातव्या शतकात स्तोत्राची निर्मिती सातव्या शतकात भक्तामर स्तोत्राची निर्मिती झाली. भक्तामर स्तोत्राची रचना आचार्य मानतुंग यांनी केल्याचे मानले जाते. भगवान ऋषभदेव अर्थात आदिनाथ यांच्या स्तुतीसाठी संस्कृत भाषेत रचलेल्या या स्तोत्राला शतकानुशतके जैन समाजात विशेष स्थान आहे. महाराजांनी दिला भक्ती, विनय, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचा संदेश विनम्रसागर महाराज म्हणाले की, प्रत्येक कडव्यातून भगवान आदिनाथ यांचे गुण, महिमा आणि आध्यात्मिक सामर्थ्य यांचे वर्णन केले आहे. श्रद्धेने स्तोत्राचे पठण केल्याने मन एकाग्र करण्यास आणि सकारात्मक विचारांना चालना देण्यास मदत होते. अहिंसा, संयम, विनय आणि सदाचार या मूल्यांचे महत्त्व स्तोत्रातून अधोरेखित होते. तसेच व्यक्तीची कोणतीही समस्या असो, त्याचे निराकरण होते. ज्यांना यश मिळत नाही, कार्यसिद्धी होत नसेल त्यांनी २१ दिवसांचा जप करावा, असे ते म्हणाले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *