![]()
अनुसूचित जातींच्या 13 टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्यात यावे, या प्रलंबित मागणीसाठी मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी मुंबईत आक्रमक आंदोलन छेडण्यात आले. मूळ नियोजनानुसार हे आंदोलन आझाद मैदानावर होणार होते. मात्र, पोलिसांना गाफील ठेवून आंदोलकांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालयाच्या परिसरात रस्त्यावर उतरून अचानक रास्ता रोको केला. यामुळे या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. मोठा पोलिस फौजफाटा तैनात असूनही आंदोलकांनी संपूर्ण परिसर व्यापून टाकल्याने मंत्रालयाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली व पोलिस यंत्रणेची मोठी तारांबळ उडाली. सध्या पोलिसांकडून या आंदोलकांना रस्त्यावरून बाजूला हटवण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. जोपर्यंत अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबाबत शासनाकडून अधिकृत निर्णय जाहीर केला जात नाही, तोपर्यंत आम्ही मुंबईतून हटणार नाही, अशी ठाम भूमिका मातंग समाजाच्या आंदोलकांनी घेतली आहे. यामुळे मुंबईतील या परिसरामध्ये सध्या तणावाचे आणि वाहतूक कोंडीचे वातावरण आहे. आंदोलन असेच सुरूच ठेवण्याचा मातंग समाजाचा निर्धार कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, या उद्देशाने कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरी, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रलंबित मागणीवर शासनाकडून जोपर्यंत ठोस निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार मातंग समाजाच्या आंदोलकांनी व्यक्त केला आहे. मोर्चापूर्वीच माजी आमदार रमेश कदम स्थानबद्ध मुंबईत आज आयोजित करण्यात आलेल्या मातंग समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच माजी आमदार रमेश कदम यांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी सकाळी सात वाजता स्थानबद्ध केले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार त्यांना या मोर्चाला जाण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, प्रशासनाच्या या कारवाईमुळे मातंग समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. रमेश कदम यांनी सांगितले की, मी आता थेट उपवर्गीकरणाचा शासन निर्णय (GR) घेण्यासाठीच आझाद मैदानाकडे रवाना झालो आहे; तरुणांनी मोठ्या संख्येने मैदानात जमावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच सकाळी मला पोलिसांनी घरातच स्थानबद्ध केले होते. या मनमानी कारवाईविरोधात माझे वकील तातडीने बोरीवली न्यायालयात गेले. न्यायालयात माझे वकील अर्ज दाखल करत असतानाच इकडे पोलिसांना आणि मला वरिष्ठ पातळीवरून फोन आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ‘तुम्ही जाऊ शकता’ असे सांगत माझी सुटका केली, अशी माहिती त्यांनी दिली. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. स्थानबद्धतेविरोधात थेट कोर्टात धाव घेताच पोलिसांची माघार!:माजी आमदार रमेश कदम यांची तत्काळ सुटका; मातंग तरुणांना मुंबईत धडकण्याचे आवाहन अनुसूचित जातींच्या (SC) 13 टक्के आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ अशा प्रवर्गांत उपवर्गीकरण करण्याच्या ऐतिहासिक मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 5 लाख मातंग बांधवांचा महामोर्चा धडकण्यापूर्वीच पोलिसांनी माजी आमदार रमेश कदम यांना स्थानबद्ध करून रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या बेकायदेशीर स्थानबद्धतेविरोधात कदम यांच्या वकिलांनी थेट बोरीवली न्यायालयात धाव घेत अर्ज दाखल करताच पोलिसांना अखेर नमते घ्यावे लागले. न्यायालयाच्या हस्तक्षेपाची चाहूल लागताच वरिष्ठ पातळीवरून चक्रे फिरली आणि पोलिसांनी कदम यांची तात्काळ सुटका केली. सुटकेनंतर स्वतः रमेश कदम यांनी सोशल मीडियाद्वारे ही माहिती देत, “मी आता थेट उपवर्गीकरणाचा शासन निर्णय (GR) घेण्यासाठीच आझाद मैदानाकडे रवाना झालो आहे; तरुणांनी मोठ्या संख्येने मैदानात जमावे,” अशी गर्जना केली आहे. वाचा सविस्तर
Source link
मुंबईत मातंग समाजाचा एल्गार!:CSMT परिसरात आंदोलक रस्त्यावर, पोलिसांकडून धरपकड; आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार