Headlines

पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:एक किलो गांजा, मोटार, मोबाइलसह 9.5 लाखांचा मुद्देमाल जप्त




गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून एक किलो गांजा, मोटार, मोबाइल असा साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी योगेश प्रल्हाद अडसूळ (वय 40, रा. काळेपडळ, हडपसर), विजय राजू हुबळीकर (वय 29), बबन बाबुराव दांडगे (वय 39), अशोक उर्फ अक्षय सतीश जाधव (वय 28), साहिल सुभाष ठोंबे (वय 27), विकास संदीप बोदडे (वय 20) यांना अटक करण्यात आली. काळेपडळ पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी एसआरपीएफ मैदानाजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती तपास पथकातील पोलिस कर्मचारी विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले, गिरिराज जगदाळे यांना मिळाली. पोलिसांनी अडसूळ याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक किलो 44 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. चौकशीत हुबळीकर, जाधव, ठोंबे, बोदडे यांनी गांजा विक्रीस दिल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गांजा, मोबाइल , मोटार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गांजा तस्करी प्रकरणात आरोपींविरुद्ध यापूर्वी कोथरूड, यवत, वानवडी, भिंगार पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब बाबर, सहायक निरीक्षक रत्नदीप गायकवाड, अमित शेटे, राजस शेख, प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहीद शेख, नीलेश देसाई, अतुल पंधरकर, प्रदीप बेडीस्कर, अमोल जाधव यांनी ही कारवाई केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *