![]()
लॅब्रेडोर जातीच्या पाळीव श्वानाने 12 वर्षीय मुलाच्या चेहऱ्याचा चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. जखमी झालेल्या मुलाच्या चेहऱ्याला आठ टाके पडले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. या प्रकरणी श्वान मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्णव विनोद ढुमणे (वय 12 रा. वडगाव शेरी) असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील विनोद (वय 42) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्वान मालकिण तपस्विनी कुणाल शिंदे हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरील शिंदे बिल्डींगमध्ये अर्णव ढुमणे आणि कुटुंबीय राहायला आहे. सकाळी साडेसहाच्या सुमारास अर्णव घरातून बाहेर पडला. शेजारी राहणाऱ्या महिलेने लॅब्रोडर जातीचे श्वान पाळले आहे. घरातून बाहेर पडलेल्या अर्णववर पाळीव श्वानाने झेप घेतली. अर्णवच्या चेहऱ्याचा चावा घेतला. श्वानाच्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या चेहऱ्याला आठ टाके पडले आहेत. रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले. पाळीव श्वानाला सुरक्षितरित्या बांधून न ठेवणे, तसेच आवश्यक ती काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. श्वानाच्या देखभालीत निष्काळजणीपा दाखविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलिस फौजदार लिंगण्णा तपास करत आहेत. शहरात पाळीव श्वानाकडून चावा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. श्वान मालकांनी सुुरक्षेबाबत पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. |
Source link
पुण्यात वडगाव शेरीत पाळीव श्वानाचा 12 वर्षीय मुलावर हल्ला:श्वान मालकिणीविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, मुलाला 8 टाके पडले