Headlines

मुंबई लोकलमध्ये 'जेन-झी'साठी 3 डबे राखीव ठेवा:भाजप नगरसेविकेची मागणी, तेजस्वी घोसाळकरांचे थेट रेल्वेमंत्र्यांना पत्र




दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ या नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी भाजपने आता विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. या रणनीतीचाच एक भाग म्हणून नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तरुणांशी संवाद साधला होता. तसेच तरुणांच्या मनातील रोष दूर करून त्यांना आपलेसे करण्यासाठी राज्यात स्थानिक पातळीवरही पक्षाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच प्रयत्नांची पुढची दिशा म्हणून आता भाजपच्या मुंबईतील नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ‘जेन झी’ पिढीसाठी एका महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. मुंबईतील महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या ‘जेन झी’ आणि ‘जेन अल्फा’ पिढीच्या विद्यार्थ्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तेजस्वी घोसाळकर यांनी थेट रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील 12 डब्यांच्या लोकल ट्रेनपैकी तीन डबे विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्याची विनंती केली असून, विशेषतः चर्चगेट-डहाणू आणि सीएसएमटी-डोंबिवली/आसनगाव या मार्गांवर पहाटे 5 ते सकाळी 11 या वेळेत हे आरक्षण लागू करण्यात यावे, जेणेकरून रोजच्या गर्दीतून प्रवास करणाऱ्या या तरुण पिढीला मोठा दिलासा मिळेल, असे घोसाळकर यांनी स्पष्ट केले आहे. लोकल ट्रेनमधून पडून एका 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू दरम्यान, मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर चालत्या लोकल ट्रेनमधून पडून एका 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी 6:10 च्या सुमारास मुंब्रा रेल्वे पुलाजवळ घडली. साईराज बेणारे (वय 27, रा. आर.जी.एस. इंग्लिश शाळेजवळ, उल्हासनगर) असे या मृत तरुणाचे नाव आहे. चालत्या ट्रेनमधून तोल जाऊन खाली पडल्यानंतर साईराज आधी तेथील एका लोखंडी रॉडला अडकला आणि त्यानंतर थेट मुंब्रा खाडीच्या पात्रात कोसळला. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रेल्वे पोलिस आणि मुंब्रा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकातील जवानांनी खाडीतून साईराजचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण करत, शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. साईराज बेणारे चालत्या ट्रेनमधून पडल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, रेल्वे पोलिस आणि मुंब्रा पोलिसांनी रेस्क्यू वाहन व रुग्णवाहिकेसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या बचाव पथकाने साईराजचा मृतदेह खाडीच्या पात्रातून बाहेर काढला आणि पुढील सोपस्कारांसाठी मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिला. त्यानंतर, शवविच्छेदन व पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आला. गर्दी नसतानाही साईराज कसा पडला? तपास सुरू ही दुर्दैवी घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली असून, या वेळेत लोकल ट्रेनमध्ये सहसा जास्त गर्दी नसते. त्यामुळे गर्दी नसतानाही साईराज ट्रेनमधून खाली कसा पडला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा अपघात त्याच्या स्वत:च्या चुकीमुळे झाला, की यामागे आणखी काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास आता रेल्वे पोलिसांकडून केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *