Headlines

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण केले:महापालिकेची वाट न पाहता शिवाजीनगरमध्ये यशस्वी मोहीम




नागपूर शहरातील शिवाजीनगर परिसरात नागरिकांनी प्रशासकीय यंत्रणा आणि महापालिकेची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज लसीकरण मोहीम राबवली. सिध्दाली फरासखानेवाला यांच्या पुढाकाराने रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. परिसरातील नागरिकांचे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांपासून संरक्षण व्हावे आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे, या उद्देशाने ही लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. शिवाजीनगर परिसरातील हा पहिलाच प्रयोग असून, आयोजकांनी येत्या काळात नागपूरमधील इतर भागांमध्येही अशाच प्रकारच्या लसीकरण मोहिमा राबवण्याचा संकल्प केला आहे. स्थानिक नागरिकांनी एकत्र येत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमाला ‘रसस्वादम्’स किचन’ आणि ‘स्पेस एड्ज सॉफिटस्टिकेशन्स’ यांनी प्रायोजकत्व दिले. तसेच विशाल खेडीकर, अभिषेक नाईक, अमित हेडा, आशिष वाधवा आणि मीनल मुंडले यांनी आर्थिक योगदान देऊन मोहीम यशस्वी करण्यास मदत केली. आयोजकांनी या सर्व प्रायोजकांचे आणि आर्थिक मदत करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. मोहीम प्रत्यक्ष यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर देशपांडे, मीनल मुंडले, किर्ती काळकर, संजीव काळकर, दिवीज काळकर, राधिका बोरकर, इला सरवटे आणि पिरोज फरासखानेवाला यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अर्चना रस्तोगी आणि डॉ. अक्षय यांनी वैद्यकीय सहकार्य पुरवले. आयोजकांनी सांगितले की, नागपूरकरांच्या अशाच सहकार्याने आगामी काळात शहरातील अधिकाधिक भागांत लसीकरण मोहीम राबवण्याचा प्रयत्न राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *