Headlines

मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याचा गळा दाबून घेतला चावा:नालंदा स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणानंतर घडली घटना‎




वर्गात दोन मुलांमध्ये झालेल्या‎भांडणाची शहानिशा न करता,‎रागाच्या भरात शाळेच्या‎मुख्याध्यापकाने एका आठ वर्षीय‎विद्यार्थ्याला अमानुष मारहाण‎केल्याचा प्रकार एका शाळेत‎घडला. मुख्याध्यापकाने‎विद्यार्थ्याचा कान पिरगाळून त्याचा‎गळा दाबला आणि त्याला हवेत‎उचलून त्याच्या उजव्या हाताचा‎चावा घेतला. या प्रकरणी‎अहिल्यानगर तालुका पोलिस‎ठाण्यात संबंधित मुख्याध्यापकावर‎गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎
याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या‎आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.‎पोलिसांनी वाळुंज येथील नालंदा‎स्कूलचे मुख्याध्यापक गौतम‎बहादुर्गे (पूर्ण नाव माहीत नाही)‎याच्याविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखल‎केला. गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंत‎कारावासाची शिक्षा‎ या गुन्ह्यात बाल न्याय (मुलांची‎काळजी व संरक्षण) अधिनियम‎२०१५ चे कलम ७५ लावण्यात आले‎आहे. हे कलम लहान मुलांवरील‎क्रूरतेबाबतच्या गुन्ह्यासाठी आहे.‎जेव्हा मुलाचा प्रत्यक्ष ताबा असलेली‎किंवा मुलावर कायदेशीर नियंत्रण‎असलेली कोणतीही व्यक्ती‎(शिक्षक, मुख्याध्यापक किंवा‎काळजीवाहू) त्या मुलाला मारहाण‎करते, छळ करते, तेव्हा या‎कलमांतर्गत गुन्हा दाखल होतो. या‎गंभीर गुन्ह्यासाठी दोषीला तीन‎वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा‎किंवा एक लाखापर्यंत दंड किंवा या‎दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *