Headlines

मुल्हेरला रासक्रीडा उत्सवास प्रारंभ:28 फूट व्यासाचे रासचक्र 14 फूटी उंच स्तंभावर चढवणार; सोमवारी गायन




मुल्हेर येथे ३७८ वर्षांहून अधिक काळाची परंपरा लाभलेल्या रासक्रीडा उत्सवाला शनिवार (दि. २४) पासून सुरुवात झाली आहे. श्री उद्धव महाराज यांच्या संजीवन समाधीच्या पावन भूमीत हा सांस्कृतिक ठेवा जपणारा उत्सव साजरा होत असून, सोमवारी (दि.२६) मुख्य रासक्रीडा उत्सव पार पडणार आहे. या सोहळ्यात २८ फूट व्यासाचे रासचक्र हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. हा ऐतिहासिक सोहळा अनुभवण्यासाठी आणि दर्शनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन मठाधिपती भक्तराज महाराज, संस्थानप्रमुख किशोर महाराज, श्रीकांत महाराज, सरपंच निंबा भानसे, उपसरपंच बन्सीलाल बत्तीसे व सप्ताह समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. सोमवारी (दि. २६) सायंकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी केळीची पाने व फुलांनी सजवलेले २८ फूट व्यासाचे रासचक्र उपस्थितांच्या ‘श्री उद्धव महाराज की जय’ या नामघोषात १४ फूट उंच रासस्तंभावर चढवले जाणार आहे. त्यानंतर रात्रभर विविध रागदारीतील १०५ पदांचे गायन होईल. सकाळी ८ वाजता ‘भैरवी’ गाऊन या सोहळ्याची सांगता होईल. ३७८ वर्षांची गौरवशाली परंपरा : रासक्रीडेची ऐतिहासिक परंपरा कृष्णभक्त राजा मयूरध्वजाने सुरू केली. त्यानंतर १६४० मध्ये श्री उद्धव महाराज यांचे गुरु श्री काशीराज महाराज यांनी या उत्सवाला पुनरुज्जीवन दिले. तेव्हापासून आजतागायत ३७८ वर्षांहून अधिक काळ ही परंपरा मुल्हेर नगरीत निष्ठेने जपली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *