![]()
लासलगाव दुचाकींना मॉडिफाइड सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात वाहने चालविणाऱ्यांविरुद्ध लासलगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत चार दुचाकींचे मॉडिफाइड सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले असून, संबंधित वाहनधारकांकडून एकूण चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात काही वाहनधारक दुचाकींना मॉडिफाइड सायलेन्सर लावून मोठ्या आवाजात वाहने चालवत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली. नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. डी. स्वामी, अप्पर पोलिस अधीक्षक विमला एम. आणि निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एएसआय पैठणकर आणि पोलिस शिपाई शिंदे यांनी सहभाग घेतला. मोठ्या आवाजात वाहने चालवून नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लासलगाव पोलिसांनी केले आहे.
Source link
मॉडिफाइड सायलेन्सर, चार दुचाकींवर कारवाई:लासलगावमध्ये चारहजारांचा दंड वसूल