![]()
शासनाने जाहीर केलेली हेक्टरी ५ हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी असून, शेतकऱ्यांच्या हाती केवळ “भोपळा’ दिला असल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. प्रभाकर साळवे यांनी केला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना किमान २५ हजार रुपयां
.
या दौऱ्याचा प्रारंभ कुंभारी बुद्रुक येथून करण्यात आला. तोंडापूर मार्गे हा दौरा जामनेर येथे पोहोचेल आणि पहिल्या दिवशी जामनेर येथेच मुक्काम असेल. दुसऱ्या दिवशी हा दौरा भुसावळ तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातून जाईल, तर तिसऱ्या दिवशी जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला जाईल. या चार दिवसीय दौऱ्यात प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली जात असून शेतकऱ्यांकडून निवेदने स्वीकारली जात आहेत.
दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी, हा शेतपाहणी दौरा जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. दौऱ्यादरम्यान जमा झालेल्या सर्व निवेदनांसह व शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत, ५ हजार रुपयांऐवजी प्रतिहेक्टरी किमान २५ हजार रुपयांची मदत तत्काळ वितरित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती ॲड. प्रभाकर साळवे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू केलेल्या या आंदोलनाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.