![]()
मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आमदार राजू खरे यांनी मुंबईत जोरदार फिल्डिंग लावली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदार खरे यांनी मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचला. या भेटीत उपमुख्यमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देत आमदार खरे यांनी सुचवलेल्या दोन महत्त्वाच्या विकासकामांसाठी तब्बल १० कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला आहे. यामुळे मतदारसंघातील विकासकामांना आता मोठी गती मिळणार आहे. आमदार राजू खरे यांनी या बैठकीत मतदारसंघातील ग्रामीण व मुख्य रस्त्यांची मंजुरी, पिण्याच्या पाण्याचे प्रलंबित प्रश्न, अपूर्ण शासकीय इमारती आणि ग्रामीण भागातील आरोग्य-वीज सुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. प्रशासकीय पातळीवर अडकलेले हे प्रस्ताव तातडीने मार्गी लावून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची आग्रही विनंती त्यांनी यावेळी केली. अनेक वर्षांपासून मोहोळमधील स्मशानभूमी ते नागनाथ मंदिर रस्ता आणि शहरातील हक्काच्या सभागृहाचा प्रश्न प्रलंबित होता. प्रशासकीय पातळीवर फाईल अडकल्याने ही कामे थांबली होती. मात्र, आ. खरे यांनी थेट उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याने या कामांना आता प्रशासकीय मंजुरी आणि निधीचा असा दुहेरी लाभ मिळाला आहे. आमदार राजू खरे यांनी मुंबईत केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मोहोळ मतदारसंघातील प्रलंबित कामांना गती मिळणार आहे. १० कोटींचा निधी जाहीर झाल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ^मतदारसंघाच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी आणि सर्व प्रशासकीय मंजुऱ्या लवकरात लवकर मिळवून दिल्या जातील. मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील याची खबरदारी घेतली जाईल. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आमदार राजू खरे यांनी मागणी केलेल्या प्रस्तावांपैकी मोहोळ शहरातील दोन मोठ्या कामांना मंजुरी मिळाली आहे. सिमेंट काँक्रिट रस्ता व पथदिवे: राष्ट्रीय महामार्ग ६५ च्या शेजारील स्मशानभूमी ते नागनाथ मंदिर या दरम्यानच्या कामासाठी ६ कोटी रुपये मंजूर. पालिकेच्या जागेत ‘माजी आमदार शहाजीराव पाटील सभागृह’ बांधण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. दोन कामांसाठी मिळणार १० कोटी रुपये केले मंजूर
Source link
मोहोळच्या विकासाला मुंबईतून ग्रीन सिग्नल:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत सकारात्मक चर्चा; आमदार राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश