Headlines

मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात:दोन दुचाकी, एक रिक्षासह 2.35 लाखांचा मुद्देमाल जप्त




पुणे पोलिसांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी आणि एक रिक्षा असा एकूण २ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारती विद्यापीठ आणि कात्रज परिसरातून या अल्पवयीन मुलाने दुचाकी व रिक्षा चोरल्या होत्या. मौजमजेसाठी त्याने हे गुन्हे केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कात्रज परिसरातील वंडर सिटी येथे तो येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्याने मौजमजेसाठी वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दोन दुचाकी आणि एका रिक्षासह एकूण तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, मितेश चोरमले, सागर बोरगे आणि अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली. ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने तरुणाची साडेपाच लाखांची फसवणूक घरातून ऑनलाइन कामाची संधी (ऑनलाइन टास्क) अशा आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची पाच लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३५ वर्षीय तरुण कोंढवा परिसरात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर गेल्या वर्षी ऑक्टोब महिन्यात संपर्क साधला. ऑनलाइन पद्धतीने घरातून कामचाी असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी त्याला एक काम दिले. हे काम पूर्ण केल्यानंतर तरुणाच्या बँक खात्यात परताव्यापोटी काही रक्कम जमा करण्यात आल्याचा बनावट संदेश पाठविण्यात आला. प्रत्यक्षात त्याला परतावा दिला नव्हता. दरम्यान, तरुणाला या कामात आणखी पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. सायबर चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी तरुणाने पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्याला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक प्रशांत मंडले तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *