Headlines

रशियन चलन देण्याच्या बहाण्याने 3.48 कोटींचा गंडा घालणारा नाशकात अटकेत:परभणीतील विद्यार्थिनीच्या पित्याच्या तक्रारीवरून कारवाई




रशियातील विद्यापीठाचे बनावट प्राधिकृत पत्र दाखवून भारतीय चलनाचे रशियन चलनात (करन्सी एक्सचेंज) रूपांतर करून देण्याचा बहाणा करून ३ कोटी ४८ लाखांची फसवणूक करणारा मुख्य संशयित शुभम राकेश सिंग याला अटक करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने पाथर्डी फाटा येथे ही कारवाई केली. प्रिया बाविसे (रा. पाथर्डी फाटा, मूळ रा. रवळगाव, परभणी) यांचे वडील पद्मसिंह चांदे यांचा विश्वास संपादन करत संशयित सिंग याने चुवाश स्टेट युनिव्हर्सिटी, चेबोक्सारी यांनी करन्सी एक्सचेंजसाठी अधिकृत केल्याचे एक पत्र दाखवले. भारतीय चलन रशियन चलनात बदलून देतो असे सांगत सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी काही चलन बदलून देण्यात आले. त्यानंतर बाविसे यांनी ७ लाख आणि ८ सहकारी विद्यार्थ्यांचे ५३ लाख, तसेच रशियातील युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या ८ विद्यार्थ्यांनी दिलेले २ कोटी ८८ लाख अशी एकूण ३ कोटी ४८ लाखांची रक्कम संशयित शुभम सिंग याच्याकडे जमा केली होती. संशयिताने आजपर्यंत ही रक्कम रशियन चलनात बदलून दिलेली नव्हती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *