![]()
येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामात चुकीच्या मोजमापाने बांधण्यात आलेली गटार रस्त्याच्या जागेत आल्याने रस्ता अरुंद होऊन नागरिकांना अडथळ्याचा सामना करावा लागत होता. गटारीचे पुढील बांधकाम थांबवून ती तोडण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने लोकप्रतिनिधी, व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा इशारा दिला. त्यानंतर प्रशासनाने वादग्रस्त गटार अखेर तोडली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम कंपनीला दिलेल्या ड्रॉइंगनुसार बिरसा मुंडा चौक ते दलपत्पुर स्टॅण्ड तसेच शनि मंदिर ते पीडब्ल्यूडी रेस्ट हाऊस या ठिकाणी रस्ता बांधकामावेळी गटार बांधण्यात आली होती. मात्र, चुकीच्या मोजमापामुळे ही गटार रस्त्याच्या जागेत आल्याने रस्ता अरुंद होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी { उर्वरित पान. ३ रस्ता रुंद हवा, अरुंद नको ^रस्त्याच्या दुतर्फा आधीच गटार असताना पुन्हा दोन्हींच्या मध्ये तिसरी गटार घेण्याची गरज नव्हती. ही गटार चुकीची असून ती तोडावी, अशी विनंती करूनही प्रशासन कारवाई करत नव्हते. त्यामुळे रस्ता रुंद हवा, अरुंद नको, या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घ्यावा लागला. – हिरामण गावित, कापड दुकानदार
Source link
रस्ता अरुंद करणाऱ्या गटारीवर अखेर हातोडा:हरसूलकरांच्या आंदाेलनाच्या इशाऱ्यानंतर कारवाई