Headlines

रस्त्याचे काम करणाऱ्या मजुरावर शस्त्राने हल्ला:खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक, एक फरार




पुण्यातील हडपसरमधील फुरसुंगी भागात रस्त्याचे काँक्रिटीकरण करणाऱ्या एका मजुरावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी प्रकाश राजेंद्र जाधव (वय ३३) आणि नीलेश उद्धव गुरव (वय ३५, दोघे रा. माऊली कॉलनी, काळेपडळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या आणखी दोन साथीदारांविरुद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील तुकाईदर्शन परिसरात रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू होते. ३१ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास आरोपी जाधव, गुरव आणि त्यांचे साथीदार घटनास्थळी आले. त्यांनी मजुरांना रस्त्याचे काम थांबवण्यास आणि रस्ता खोदण्यास मनाई केली. आरोपींनी मजुरांना शिवीगाळ करत काम केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी तक्रारदार मजुराच्या डोक्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले आणि तेथून पसार झाले. जखमी मजुराने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपास करत दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करत आहेत. सिमेंटची पोती ठेवलेला ट्रक पळवून नेला सिमेंटची पोती ठेवलेला ट्रक पळवून नेल्याची घटना हडपसर भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीने त्यांचा ट्रक हडपसरमधील डीपी रस्ता परिसरात लावून ठेवला होता. ट्रकमध्ये सिमेंटची पोती होती. पोती झाकून ठेवण्यात आली होती. डीपी रस्त्यावर लावलेला ट्रक मध्यरात्री पळवून नेला. ट्रक चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. ट्रक चोरुन पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *