![]()
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक मंगळवार १९ रोजी अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. यामध्ये सभापतीपदी राजेंद्र श्रीराम राजणेकर यांनी बहुमताने विजय मिळवला. तसेच उपसभापतीपदी प्रशांत बाकेराव कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. सभापती पदाच्या निवडणुकीत काहीशी चुरस दिसून आली. या पदासाठी राजणेकर व अतुल चांडक यांचे दोन अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर झालेल्या अत्यंत चुरशीच्या मतदान प्रक्रियेत राजणेकर यांना १२ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी अतूल चांडक यांना केवळ ३ मते मिळाली. मतदानादरम्यान २ संचालक तटस्थ राहिले, तर १ संचालक गैरहजर होते. बहुमताच्या जोरावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी राजेंद्र राजणेकर यांना सभापती म्हणून घोषित केले. उपसभापती पदासाठी कोल्हे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रशांत कोल्हे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर सहकाऱ्यांकडून जल्लोष करण्यात आला. सभापती, उपसभापतींच्या नावाची अधिकृत घोषणा होताच नवनियुक्त सभापती राजणेकर व उपसभापती कोल्हे यांचे उपस्थित सर्व संचालक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून, फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे भरवून स्वागत करण्यात आले. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. बी. इंगळे यांनी अत्यंत पारदर्शकपणे काम पाहिले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व नवनियुक्त व सन्माननीय संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. नवनियुक्त सभापती व उपसभापती यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बाजार समितीच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. संपूर्ण तालुक्यातून या निवडीचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे. राजेंद्र श्रीरामजी राजणेकर (नवनियुक्त सभापती, कवठा कडू), प्रशांत बाके कोल्हे (नवनियुक्त उपसभापती, दिघी कोल्हे) ,गणेश सीताराम आरेकर (संचालक, धानोरा म्हाली), रविंद्र अशोक देशमुख (संचालक, बोरी), प्रभाकर हरगोविंद वाघ (संचालक, चांदूर रेल्वे), रामेश्वर पंढरीनाथ वानखडे (संचालक, टोंगलाबाद), रावसाहेब हरिनारायण शेळके (संचालक, टेंभुर्णी), मंगेश श्रीधर धावडे (संचालक, दहीगांव धावडे), अतुल दयाचंद चांडक (संचालक, सानोरा बु.),वर्षा प्रदीप वाघ (संचालिका, कमळगांव), पूजा श्रीनिवास देशमुख (संचालिका, जावरा), वसंता अण्णा गाढवे (संचालक, जावरा), तेजस हरिभाऊ भेंडे (संचालक, बग्गी), आशुतोष अमरसिंह गुल्हाने (संचालक, घुईखेड), हरिभाऊ वसंत गवई (संचालक, पाथरगांव), सुभाष मुलचंद अग्रवाल (संचालक, चांदूर रेल्वे), श्यामसुंदर पनपालिया (संचालक, शिरजगांव को.), सुरेश नामदेव जाधव(संचालक, चांदूर रेल्वे), चेतन साहेब इंगळे(सचिव, चांदूर रेल्वे). अशी संचालक मंडळाची निवड झाली. चांदूर रेल्वे संचालक मंडळावर निवड झालेले सदस्य मंडळ
Source link
राजणेकरांची चांदूर रेल्वे बाजार समितीच्या सभापतीपदी निवड:उपसभापतीपदी प्रशांतजी कोल्हे यांची निवड; अतुल चांडक यांना दोन मते